शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

खरेदी खत

जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो. तो म्हणजे खरेदी खत.

खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.

यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते.

खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.

नवीन शेत जमीन खरेदी करत असताना पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇👇

सातबारा उतारा

शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे.

गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.

सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते. यावरून जमिनीचा खरा मालक कोण, याची ओळख पटण्यास मदत होते.

डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२ सातबारा डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा. 👇👇

  • भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
  • भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.
  • तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
  • चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.

आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा काढणं कधीही सोयीस्कर ठरतं.

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

जमीन मोजणीचे नकाशे

जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो.

त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं.

एका ठरावीक गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचं शेत आहे, तेही यातून कळतं.

शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇👇

जमीन महसूलाच्या पावत्या

दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावती, हासुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो.

या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

तुमच्या शेत जमिनीला रस्ता नसेल तर खालील बटन वर क्लिक करा. 👇👇

खाते उतारा किंवा 8-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते.

या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.

8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते.

त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अचा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून दिला आहे.

डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले

एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्रं, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी कागदपत्रं जपून ठेवली पाहिजे.

याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येऊ शकतो.

प्रॉपर्टी कार्ड

बिगरशेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही जागरूक राहणं आवश्यक असतं. बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड.

ज्या पद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.

बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते. त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावल मालमत्तेचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय.

बिगरशेती क्षेत्रात घर असेल तर संबंधित व्यक्तीनं घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्यात. घराच्या मालकीविषयी वाद निर्माण झाल्यास त्यांचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

E Ration Card. आता नाही राहणार रेशन कार्ड! | आता ऑनलाईन मिळणार ई रेशन कार्ड.

E Ration Card. आता नाही राहणार रेशन कार्ड! | आता ऑनलाईन मिळणार ई रेशन कार्ड.

Ration Card Update: शिधापत्रिका अर्थात रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे ...
पुढे वाचा
ठिबक सिंचनाला 80% अनुदान :  मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

ठिबक सिंचनाला 80% अनुदान : मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सर्वसमावेशक ...
पुढे वाचा
पीएम सुर्य घर योजनेमधून मिळणार १ कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज |pm surya ghar solar scheme

पीएम सुर्य घर योजनेमधून मिळणार १ कोटी कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज |pm surya ghar solar scheme

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्य ...
पुढे वाचा
कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

Low Cibil Score personal loan CIBIL Score :  तुमचा CIBIL स्कोअर किंवा ...
पुढे वाचा
आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक

आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक

पॅन कार्ड म्हणजे काय? कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) हा दहा-अंकी ...
पुढे वाचा
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

महाराष्ट्र सरकारने 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ...
पुढे वाचा
आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
पुढे वाचा
टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन :   एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :   माती परीक्षण ...
पुढे वाचा

Leave a Comment