एलपीजी सिलेंडर चे दर 200 रुपयांनी कमी | या ग्राहकांना 400 रुपयांचा नफा होणार | LPG gas price cut by rs 200.

LPG Gas Price Cut:

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनता खास करून गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करण्याची सरकारने घोषणा केली आहे. तर उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे.

या ग्राहकांना ४०० रुपये अनुदान मिळणार.👇👇

केंद्र सरकार : रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल.

केंद्राची घोषणा
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.

उज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.👇👇👇

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर


राजधानी दिल्लीत सध्या अनुदानाशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ४०० रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ९०३ रुपये असेल. कमी झालेली किंमत आज रात्रीपासून लागू होणार आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या असताना अनेक दिवसांपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. घरगुती सिलेंडरची किंमत सध्या मुंबईत ११०२.५० रुपये असून वरील घोषणेननंतर आता मुंबईकरांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपयेहून कमी किंमत मोजावी लागेल.

प्रधानमंत्री उज्वला योजनेची‌ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून करोनाच्या वेळी झालेले नुकसान आता भरून निघाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वाहन इंधनाच्या दरातही मोठी कपात करू शकते.

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती ...
पुढे वाचा
TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
पुढे वाचा
सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी |अर्ज करण्याची पद्धत.

सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी |अर्ज करण्याची पद्धत.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी Sukanya Samriddhi Yojana ...
पुढे वाचा
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत |berojgari bhatta yojana apply

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत |berojgari bhatta yojana apply

राज्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून बेरोजगारी भत्ता ...
पुढे वाचा
हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

पंजाबराव डख हे हवामान खात्याचे प्रसिद्ध अभ्यासक असून त्यांनी शेतकऱ्यांना ...
पुढे वाचा
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

सध्याच्या काळात आयुर्विम्याचे महत्त्व वाढत असताना लोक मोठ्या प्रमाणात विमा ...
पुढे वाचा

Leave a Comment