आपल्या आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे.विविध सरकारी सेवा योजनांचा लाभ घेण्यासाठी,विविध योजनांची केवायसी करण्यासाठी तसेच बऱ्याच शासकीय योजनांसाठी ऑनलाईन पोर्टल वरून अर्ज करण्यासाठी आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवूनच अर्ज भरता येतो.त्यामुळे आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे आहे.
आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करा
बऱ्याच नागरिकांचा मोबाईल नंबर हरवलेला असतो, बदललेला असतो किंवा आधार कार्डशी लिंक केलेला नसतो.आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक(Aadhar Mobile Link) करण्यासाठी नागरिकांना आधार सेंटर वर जावे लागते.बऱ्याच वेळा आधार सेंटर वर जास्त गर्दी असल्याने किंवा सर्व्हर बंद असल्याने अनेक हेलपाटे मारावे लागतात.त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी ही प्रक्रिया खूप किचकट आहे.
तुमच्या मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
आपल्याला बऱ्याच कामासाठी आधारकार्ड गरजेचे असते. कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा बँकमध्ये आपल्याला आधार कार्ड अनिवार्य आहे. परंतु आधार कार्डला आपला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपल्याला आधारच्या सुविधा घेण्यास अडचीण येत असतात. उदा. otp आपल्याला प्रधानमंत्री शेतकरी योजनेची ekyc करताना सुद्धा आधार कार्ड लिंक करावे लागते परंतु आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यास otp येत नाही त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही.
Aadhar Mobile Link
आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आपल्याला तालुका ठिकाणी आधार सेंटरला गर्दीमध्ये जाऊन आधारकार्डला मोबाईल लिंक करावा लागतो. यासाठी आपला खूप वेळ जातो . पण आता आपल्याला घरबसल्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करता येतो तेही गती सोप्या पद्धतीने. आधार कार्डला मोबाइल नंबर घरबसल्या कसे लिंक करायचे ते पहा.
तुमच्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
जर तुम्हाला आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. अनेकदा आपला मोबाईल नंबर बंद होऊन जातो. किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला जर नंबर बदलायचा असेल तर काय करावे हे जाणून घेणार आहोत.
आधार कार्डमध्ये नवा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा?
पहिली पायरी
१) आपल्याला इंडिया पोस्ट या वेबसाईट वर जावे लागेल . https://ccc.cept.gov.in/ServiceRequest/request.aspx
२) त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाईप करावे लागेल.
३) त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता टाईप करा.
४) पिनकोड टाईप करा.
५) आता तुमचा ई- मेल आणि मोबाईल नंबर नोंदवा.
६) आता तेथून IPPB – Aadhar service सेलेक्ट करा.
७) आता आपण मोबाईल नंबर लिंक ला सेलेक्ट करा.
८) तुमच्या मोबाईल वर otp जाईल तो भरा.
९) त्यानंतर तुम्हाला Request Ref No: येईल तो जपून ठेवा.
आता तुमची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. तुमच्या घर २ ते ३ दिवसात पोस्टमन येईल आणि घरबसल्या तुमच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून देईल. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. अश्याप्रकारे आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करा. त्याचप्रकारे त्याचप्रकारे ५ वर्षापर्यंत लहान मुलांचे आधार कार्ड काढू शकता.
तुमचे आधार कार्ड पीव्हीसी मध्ये बनवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
किंवा
पायरी क्रमांक 2
आधार – मोबाइल नंबर ऑनलाइन असे करा लिंक
- सर्वात प्रथम तुमच्या वीआय, एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम ऑपरेटरच्या वेबसाइटवर जा.
- आधार कार्ड टॅबवरून मोबाइल नंबरला अपटेड/लिंक करण्याच्या पर्यायावर जा. येथे जो नंबर रजिस्टर करायचा आहे तो टाका.
- नंबर सबमिट केल्यानंतर त्यावर ओटीपी येईल.
- ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल.
- त्यानंतर तुम्हाला १२ आकडी आधार नंबर द्यायचा आहे.
- टेलिकॉम ऑपरेटर ओटीपी जनरेटसाठी एक मेसेज ई-केवायसी डिटेल्सबाबत विचारेल.
- सर्व नियम व अटी स्विकारू ओटीपी टाका. त्यानंतर आधार आणि फोन नंबर री व्हेरिफिकेशनबाबत एक कन्फर्मेशन मेसेज येईल.
तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करून देखील याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता. तसेच, ऑनलाइन पद्धतीपेक्षा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अगदी सहज आधार-मोबाइल नंबर लिंक करू शकता.
aadhar card la mobile no link kara gharbaslya | how to link aadhar card in mobile | aadhar card me mobile no jode