शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

२१ जुलै पासून अंमलबजावणी

येत्या 21 जुलैपासून हे दर देणे दूध संघांना बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.

दूध दरासाठी दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने 3.5/8.5 या गुणप्रतिच्या दुधास 34 रुपये दर निश्चित करण्याची केलेली शिफारस राज्य सरकारने मान्य केली आहे. तसेच हा दर विनाकपात दूध उत्पादकांना देणे बंधनकारक आहे. दूध दराची अंमलबजावणी होते की नाही, याबाबतचा अहवाल जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकार्‍यांना सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आढावा घेऊन या समितीने दर तीन महिन्यांनी किमान दूध खरेदी दराची शिफारस राज्य सरकारला करावयाची आहे. परंतु, विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास तीन महिन्यांपूर्वीही समितीने दूध दराबाबत शासनाला शिफारस करणे गरजेचे आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

राज्यातल्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दूध उत्पादकांना आता गाईच्या दुधाला किमान 34 रुपये लिटर दर (Minimum price for cow milk) मिळणार आहे. राज्य शासनाने तसे आदेश काढल्याची माहिती दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सहकारीसह खाजगी दूध संघांनाही हे आदेश लागू असणार आहेत. तसेच दर तीन महिन्यांनी दूध दराबाबत आढावा घेतला जाणार आहे. यासोबत पशुखाद्याच्या दरातही पंचवीस टक्के कपात करण्याच्या संबंधित कंपन्यांना सूचना सरकारनं केल्यात. पशुखाद्याच्या गोंण्यावर घटकांचा उल्लेख करणं बंधनकारक करण्यात आलाय.

हे उपाय करा, आपल्या गाईचे किंवा म्हशीचे दूध १००% वाढेल????????????

आपल्या गाईचे किंवा म्हशीचे फॅट वाढवणार असाल तर या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.????????????

पशुखाद्याचे दर २५% कमी करावेत.




हिरवा आणि कोरड्या चाऱ्यांचे भाव गगनाला भिडले होते. तसेच पशु खाद्याचे भाव वाढल्याने गरीब दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. त्यामुळे दुधाचा किमान 40 रुपये भाव मिळावा, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत विविध दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधींसोबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली होती.


जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्या मार्फत सरकारला दरमहा अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यासंबंधीचे आदेश विखे पाटील यांनी दिले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असल्याचं विखे पाटील म्हणाले. पशुखाद्याच्या किमती 25 टक्‍क्‍यांनी कमी करा अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा देखील विखे पाटील यांनी पशुखाद्य कंपन्यांना दिला आहे.



दरम्यान, शासनाच्या या निर्णयानंतर गरीब गरजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, फक्त 34 रुपये किमान किंमत ठरवल्याने काहीजणांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांची मतं जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर आता हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो ...
पुढे वाचा
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
पुढे वाचा
पी एम किसान लाभार्थी स्टेटस

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा PM किसान (वेबसाईटवर ...
पुढे वाचा
स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

घरबसल्या बनवा वोटर आयडी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर ...
पुढे वाचा
गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव पहा. कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन ...
पुढे वाचा
ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
पुढे वाचा
तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण मतदान कार्ड मोबाईल वरून pdf ...
पुढे वाचा

Leave a Comment