पशु किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार ४ टक्के व्याजदराने कर्ज |Pashu Kisan Credit Card Yojana.

पशु किसान क्रेडिट योजना संपूर्ण माहिती

Agriculture Loan : देशातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवतं. देशातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड स्किमची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.    

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तेही फक्त ४ टक्के व्याजदराने मिळणार आहे.

👉पर्सनल लोन साठी क्लिक करा. 👈

योजना काय आहे?

ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. पशुपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देऊन त्याला उभारी देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. केंद्र सरकार या योजनेसाठी पशुपालकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी दीड लाख रक्कमेपर्यंत तारण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे दीड लाख मर्यादेपर्यंतचं कर्ज विना तारण मिळेल.

पशु किसान क्रेडिट योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

कर्ज किती मिळणार? 

पशु किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत म्हशीसाठी ६० हजार, गायीसाठी ४० हजार, बकरी आणि मेंढ्यांसाठी ४ हजार आणि एक कोंबडीमागे ७२० रुपये कर्ज दिले जाते. बॅंक किंवा वित्तसंस्था पशु किसान क्रेडिट कार्डधारकांना फक्त ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत आहे. पशुपालकांना ६ समान हप्त्यांमध्ये कर्जाचं वितरण केलं जातं. त्यांना त्याची ५ वर्ष कालावधीत परतफेड करावी लागेल. साधारणत: बॅंका शेतकऱ्यांना ७ टक्क्यांनी व्याज दराने कर्ज देत असते. मात्र, पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतकऱ्यांना ३ टक्क्यांची सूट दिली जाते.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा कोण कोणत्या सहा बँका ज्या तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कर्ज देणार आहेत?

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया. (SBI)
  2. एचडीएफसी बँक. (HDFC)
  3. पंजाब नॅशनल बँक. (PNB)
  4. बँक ऑफ बडोदा. (BOB)
  5. आय.सी.आयसीआय बँक. (ICICI)
  6. एक्सिस बँक. (AXIS BANK)

या योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. मतदान कार्ड.
  4. पासपोर्ट साईज फोटो.
  5. मोबाईल नंबर.

पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या श्रमातूनच राज्याची अर्थव्यवस्था ...
पुढे वाचा
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

परिचय:कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो लोकांना उपजीविका प्रदान ...
पुढे वाचा
पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र ...
पुढे वाचा
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
पुढे वाचा
जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते?

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते?

अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात ...
पुढे वाचा
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ किंवा फोटो मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा | how to download Instagram photo and video in mobile

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ किंवा फोटो मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा | how to download Instagram photo and video in mobile

आजकाल आपण पाहिले तर सध्याच्या युगात सर्वात जास्त वापरले जाणारे ...
पुढे वाचा

Leave a Comment