Satbara boja now Online: वारस नोंदी. मयताचे नाव कमी करणे किंवा बोजा चढविणे,satbara Land record कमी करणे अशा स्वरुपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, ही कामे देखील केवळ 25 रुपयांमध्ये महा ई सेवा केंद्र, सेतू आणि आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने करता येणे आता शक्य आहे. सरकारने या संदर्भात एक महत्त्वाचा शासननिर्णय जाहीर केला आहे आणि सर्व सामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही.
तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता.
हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
वारस नोंद ऑनलाईन करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास काय करावे?
ग्रामिण भागात शेतजमीन ही कुटुंबातील कर्त्यापुरुषाच्या किंवा वयाने मोठ्या व्यक्तीच्या नावे असते. अशावेळी शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्याचा अचानक मृत्यू झाल्यास वारसांनी जमिनीचे हक्क मिळावे यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, ते आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत वारस नोंदीसाठी शासनाकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या वारस नोंद अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे योग्य असल्यास वारसाची जमिनीच्या सातबारावर नोंद केली जाते.
तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Satbara boja now Online
महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-हक्क’ प्रणाली, ई चावडी अशी संकेतस्थळे विकसित केली आहे. या संकेतस्थळांच्या मदतीन शेतकरी घरबसल्या 8 प्रकारची जमिन विषयक कामे करु शकतात.Satbara boja now Online
- वारसाची नोंद करणे.
- ई – करार नोंदणी
- जमिनीच्या सात बारा मधील चूक दुरुस्त करणे
- बोजा चढविणे किंवा बोजा कमी करणे.
- मयत व्यक्तीचे नाव कमी करणे
- अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे
- एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे
- विश्वस्तांचे नाव बदलणे
तुमच्या सातबारावर वारस नोंद ऑनलाईन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇
वारस नोंद म्हणजे नेमके काय?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किंवा इतर मालमत्ता असते व दुर्दैवाने अशा व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती जमीन मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये वारस नोंदणीसाठी अर्ज करणे गरजेचे असते.
यामध्ये एखाद्या मालमत्ता धारकाचा जर मृत्यू झाला तर मृत झालेल्या व्यक्तीची विधवा, मृताचा विधुर पती, मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी आणि मृताची आई हे व्यक्ती त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा वारस म्हणून उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा अधिकृत प्रमाणपत्राकरिता अर्ज करू शकतात.
तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.👈
वारस नोंद करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
वारस नोंदी करिता वैध माहितीसह फॉर्म भरणे गरजेचे असून घर नोंदणी प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा, न्यायालयीन शिक्का, रेशन कार्ड, वारसांचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्ती जर सरकारी सेवेमध्ये कार्यरत असेल तर सेवा नियमावली आणि सेवा आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक असते.