केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवी च्या खूप साऱ्या फायदेशीर योजना राबविल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना आहे
या योजनेनुसार आई वडील आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात व मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार द्वारा 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेली मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही केंद्र सरकारची सर्वात कमी गुंतवणुकीची विशेष करून मुलींसाठी बचत योजना आहे मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे.
या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account या नावाने देखील ओळखले जाते.
मुलींचे आई-वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्या बँक किंवा पोस्ट खात्याला सुकन्या समृद्धी योजना असे म्हणतात.
या योजनेचा शासन निर्णय व जीआर पहा👈
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये व अधिकतम १.५ लाख गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्या पासून फक्त 15 वर्षापर्यंत त्या खात्यात तुम्हाला पैसे भरायचे असतात पुढील 15 ते 21 वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते या योजनेत 35.27 टक्के तुमची गुंतवणूक असते आणि 64.73 टक्के रक्कम व्याजाच्या स्वरूपात दिली जाते. कमी गुंतवणुकीच्या योजनांपैकी ही एकमेव अशी योजना आहे ज्यात तुम्ही फक्त 250/- रुपये गुंतवणूक करून त्याचा चांगला परतावा मिळवू शकता.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा शैक्षणिक विकास करून त्यांना भविष्यात सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇
नवीन अपडेट
आधी एका परिवारातील फक्त 2 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता नवीन अपडेट अनुसार एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
इतर काही योजना: 👇👇
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना
रूफटॉप सोलार योजना
शेळीपालन अनुदान योजना
शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य
Sukanya Samriddhi Yojana Marathi Purpose
- मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.
- मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
- राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
- भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
- मुलींचे जीवनमान सुधारणे
- भविष्यात मुलींना स्वतःच्या पायावर उभे करणे
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
Maharashtra Sukanya Samriddhi Yojana Features
- राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
- या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय 21 वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त 15 वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
- मुलीचे वय 21 वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
- मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त 50 टक्के रक्कम काढता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान 250/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला 50/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजना 100 टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी कोणकोणत्या बँकांमधून लाभ घेता येतो याची यादी पहा.👇👇
महाराष्ट्र सुकन्या समृद्धी योजनेचे लाभार्थी
Sukanya Samriddhi Yojana Maharashtra Beneficiary
- महाराष्ट्र राज्यातील 21 वर्षाखालील सर्व जाती धर्माच्या मुली या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे
Sukanya Samriddhi Yojana Benefits
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
- सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
- या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
- या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
- मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
- देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो.
- कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
- कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
- जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
- या योजनेचा कालावधी 21 वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील 15 ते 21 वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
- सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान 30,000/- रुपये ते 75,000/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला 600/- रुपये शिष्यवृत्ती प्रति 6 महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
- अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
इतर काही योजना: 👇👇
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना
रूफटॉप सोलार योजना
शेळीपालन अनुदान योजना
शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना
सुकन्या समृद्धी योजनेचे नुकसान
Sukanya Samriddhi Yojana Disadvantages
- या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21 वर्षाचा असतो.
- या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6 टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21 वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.
- या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5 लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.
सुकन्या समृद्धी योजना पात्रता
Sukanya Samrudhhi Yojana Eligibility
- अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
शासनाच्या इतर योजना
सुकन्या समृद्धी योजना अटी
Sukanya Samriddhi Yojana Eligibility
- मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त 10 वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
- जर एखाद्या कुटुंबात 2 मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या 2 खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
- मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने पैसे भरता येतात.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
- मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.
- फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
- मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇
खालील परिस्थितीत सुकन्या समृद्धी योजना खाते बंद करता येईल
Sukanya Samriddhi Yojana Discontinued
- सुकन्या समृद्धी खाते उघडून 5 वर्षे पूर्ण झाल्यावर सदर खाते बंद करता येईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
- लाभार्थ्याला एखादा आजार झाल्यास सदर खाते बंद करता येईल.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Sukanya Samriddhi Yojana Documents Required
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- विज बिल
- मुलीच्या आई-वडिलांचा फोटो रहिवासी प्रमाणपत्र
कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे हे मुलीच्या आईवडिलांचे असणे आवश्यक आहे जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.
सुकन्या समृद्धी योजनेचे जुने व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana Post Office Calculatorवर्षव्याजदर
03.12.2014 TO 31.03.2015 9.1%
01.04.2015 TO 31.03.2016 9.2%
01.04.2016 TO 30.09.2016 8.6%
01.10.2016 TO 31.03.2017 8.5%
01.04.2017 TO 30.06.2017 8.4%
01.07.2017 TO 31.12.2017 8.3%
01.01.2018 TO 30.09.2018 8.1%
01.10.2018 TO 30.06.2019 8.5%
01.07.2019 TO 31.03.2020 8.4%
01.04.2020 TO 30.12.2021 7.6%
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 2015 साली केली गेली त्या वेळी व्याजदर 9.1 टक्के होता. वर्तमान स्तिथीमध्ये हाच व्याजदर कमी होऊन 7.6 टक्के आहे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर सदर व्याजदर अवलंबून असतो.
शासनाच्या इतर योजना
इतर काही योजना:👇👇
ट्रॅक्टर अनुदान योजना
कडबा कुट्टी अनुदान योजना
कुसुम सोलर योजना
नमो शेतकरी महा सन्मान योजना
सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी 50000/- रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6 टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने 126607/- इतकी रक्कम मिळेल तर 21 वर्षाला एकूण 211420/- रुपये मिळतील.
तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला 21 वर्षानंतर मिळेल.