ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देते.

राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ठ करावे लागतात.आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

ट्रॅक्टर खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज योजनेतून अंतर्गत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇

महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी MahaDBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी अनुदान देणे व कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र महत्वपूर्ण माहिती 

शेतकरी मित्रांनो तुम्‍ही स्वतः महाडीबीटी पोर्टलवर तुमच्‍या किंवा इतरांच्‍या माध्‍यमातून ऑनलाइन नोंदणी करू शकता आणि या अनुदाना संबंधित माहिती जास्तीत जास्त लोकांना पाठवू शकता, जेणेकरून या योजनेचा राज्यातील सर्वांना अधिकाधिक फायदा व्हावा. ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 महाडीबीटी पोर्टलवर सर्वात जास्त चालणारी एकमेव योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 आणि आज आपण आमच्या लेखात या योजनेबद्दल तपशीलवार माहिती पाहणार आहोत. ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 मध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळत आहे, मात्र यामध्ये सरकार शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदीसाठी सुद्धा अनुदान देणार आहे.

  • योजना: ट्रॅक्टर अनुदान योजना
  • व्दारा सुरु.: महाराष्ट्र सरकार राज्य महाराष्ट्र
  • अधिकृत वेबसाईट : https://mahadbt.maharashtra.gov.in/
  • विभाग: कृषी विभाग .
  • लाभार्थी : राज्यातील शेतकरी
  • उद्देश्य: यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढविणे तसेच राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
  • लाभ : शेतीसाठी ट्रॅक्टर आणि संबंधित यंत्रांसाठी अनुदान
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन किंवा ऑफलाईन
  • श्रेणी : राज्य सरकारी योजना वर्ष 2023

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 या कृषी यंत्रांसाठी व अवजारासाठी अनुदान मिळेल 

हे मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे शेती अवजारांसाठी आणि शेतीमध्ये उपयोगात येणाऱ्या यंत्रांसाठी मिळेल 

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर जंगम उपकरणे
  • बैल चालवणारी अवजारे/यंत्रसामग्री
  • मानवी शक्तीवर चालणारी यंत्रे / अवजारे
  • प्रक्रिया सेट
  • काढणीनंतरचे तंत्रज्ञान
  • बागायती यंत्रे / अवजारे
  • विशेष यंत्रे / अवजारे
  • स्वयंचलित मशीन

महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत खालील कृषी यंत्रे/औजारे खरेदीसाठी शेतकरी लाभ घेऊ शकतात.

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • बैल चालवणारी यंत्रे / अवजारे
  • बागायती यंत्रे / अवजारे
  • स्वयंचलित डिव्हाइस
  • काढणी यंत्र
  • मानवी शक्तीवर चालणारी यंत्रे / अवजारे
  • ट्रॅक्टर अवजारे
  • अद्वितीय मशीन टूल्स
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर जंगम उपकरणे

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये

Tractor Anudan Yojana Maharashtra

  • ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

ट्रॅक्टर अनुदान योजना फायदे

Tractor Subsidy Scheme Benefits

  • शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल.
  • राज्य शासनाकडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • राज्य शासनाकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत शेतकरी स्वतःच्या आवडीचा ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
  • अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याला बँकांकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • महिला शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राथमिकता दिली जाते.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, शेतकरी जमीन मशागतीची यंत्रे/अवजारांसाठी खरेदीसाठी लाभ घेऊ शकतात.

  • पॉवर टिलर 
  • ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित 
  • औजारे
  • वखर
  • 20 BHP पेक्षा कमी नांगरणी
  • पॉवर वखर 
  • मोल्ड बोर्ड नांगर  

जमीन सुधारणा मशागतीची अवजारे

  • कल्टिव्हेटर 
  • रोटोकल्टिव्हेटर
  • चीजल नांगर, वखर
  • पॉवर, वखर, बांड फॉमडर
  • क्रष्ट ब्रेकर, पोस्ट होल डगर लेव्हलर ब्लेड
  • विड स्लॅशर
  • रीजर, रोटो पडलर
  • केज व्हील
  • बटाटा प्लांटर 

आंतरमशागत

  • ग्रास विड स्लॅशर
  • फरो ओपनर
  • पॉवर विडर 

पेरणी आणि यंत्रसामग्रीसाठी आर्थिक मदत

  • रेज्ड बेड प्लांटर
  • न्युमॅटिक प्लांटर
  • न्युमॅटिक व्हेजीटेबल, सीडर,रेज्ड बेड प्लांटर इनक्लाईन प्लेट व शेपर अटॅचमेंटसह 
  • न्युमॅटिक व्हेजीटेबल ट्रान्सप्लांटर
  • पेरणी यंत्र / बियाणे खत पेरणी यंत्र (5 फण)
  • बीज प्रक्रिया ड्रम 
  • ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (एअरकॅरिअर / एअर असिस्ट)

पीक संरक्षण साधनांसाठी अनुदान

  • ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेअर (बूम टाईप)
  • ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रिस्टॅटिक स्प्रेअर
  • ट्रॅक्टर ड्रॉन रिपर 

कापणी आणि मळणीची अवजारे

  • रिपर कम बाईडर
  • कांदा काढणी यंत्र
  • भुईमूग शेंगा तोडणी यंत्र
  • बटाटा काढणी यंत्र
  • भुईमूग काढणी यंत्र
  • प्लास्टिक मल्चिंग यंत्र
  • स्टी रिपर 
  • राईस स्ट्रॉ चॉपर 
  • उस पाचट कुट्टी
  • ब्रश कटर  
  • कडबा कुट्टी
  • कोकोनट फौंड चॉपर
  • स्टबल शेव्हर
  • मोवर
  • मोवर श्रेडर
  • प्लायल हारव्हेस्टर
  • बहुपीक मळणी यंत्र
  • भात मळणी यंत्र
  • उफणणी पंखा
  • मका सोलणी यंत्र
  • मोल्ड बोर्ड नांगर 

ट्रॅक्टर अनुदान योजना अटी

Tractor Subsidy Scheme Maharashtra Terms & Condition

  • एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टर चा लाभ घेता येईल.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती वर्गामधील असलेल्या ने आवश्यक त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
  • या योजनेचा फायदा केवळ एकच औजारासाठी देण्यात येईल म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येईल उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे / यंत्र इत्यादी.
  • शेतकऱ्याचे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक
  • लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित औजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल परंतु त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल.
  • जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने औजारासाठी लाभ घेतला असेल  परंतु त्याच औजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
  • एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Tractor Subsidy Scheme Documents

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा 8अ दाखला
  • अर्जदार अनुसूचित जाती जमाती चा असल्यास जात प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
  • स्वयंघोषणापत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
  • पूर्व संमती पत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जो आवजार खरेदी करायचा आहे त्या अवजाराचे कोटेशन.
  • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला अवजार तपासणी अहवाल

ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदार शेतकरी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

अर्जदाराने एकाच वेळी अनेक वेळा अर्ज केला असल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या वर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. व खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत कोण कोणत्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते?

ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत जमीन मशागत यंत्र, जमीन सुधारणा पूर्वमशागत अवजारे, आंतर मशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण अवजारे काढले व मळणी अवजारे या अवजारांसाठी अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे Bhumi Land Records ...
पुढे वाचा
शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

खरेदी खत जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी ...
पुढे वाचा
गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने ...
पुढे वाचा
लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक ...
पुढे वाचा
गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

अरे व्वा! गांडूळ खताचा व्यवसाय सुरू करा, सरकार देत आहे ...
पुढे वाचा
टोमॅटो शेती साठी आवश्यक जमीन | शेती तयार करणे व रोपांची लागवड.

टोमॅटो शेती साठी आवश्यक जमीन | शेती तयार करणे व रोपांची लागवड.

जमीन : चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या ...
पुढे वाचा
जलसंपदा विभाग मेगा भरती|अर्ज करा.

जलसंपदा विभाग मेगा भरती|अर्ज करा.

जलसंपदा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया जलसंपदा विभाग भरती 2023 ...
पुढे वाचा
Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर ...
पुढे वाचा
शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरता सुधारित धोरणास ...
पुढे वाचा
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती ...
पुढे वाचा

Leave a Comment