विहीर अनुदान योजना 2023 | विहीर काढण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव विहीर अनुदान योजना आहे. या योजनेला मागेल त्याला विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.

राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खणण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून 4 लाखाचे अनुदान देण्यात येते. जेणेकरून शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ते शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहॆ. शेती पिकासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात विहीर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला.

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.
मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल अशी आशा आहे त्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला विहीर योजना सुरु करण्याचा विचार केला आहे.

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇

वाचकांसाठी महत्वाची सूचना

आम्ही विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून शेतात सौर कृषी पंपाचा वापर करू शकतील. योजनेचे नावविहीर अनुदान योजना महाराष्ट्रराज्यमहाराष्ट्रविभागकृषी विभागलाभ4 लाख रुपयेउद्देश्यशेतकऱ्याचा आर्थिक विकास करणेलाभार्थीराज्यातील शेतकरीअर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

३ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्या साठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇👇

विहीर अनुदान योजनेचा उद्देश

Vihir Anudan Yojana Purpose

  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
  • राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
  • विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहॆ.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.

ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजनेबद्दल माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇👇

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Magel Tyala Vihir Anudan Yojana Features

  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे मागेल त्याला विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहॆ.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहॆ.
  • विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहॆ.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली विहीर अनुदान योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे

विहीर अनुदान योजनेसाठी पात्रता व कागदपत्रे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇

विहीर अनुदान योजनेचा लाभ

Vihir Anudan Yojana Benefits

  • मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
  • राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकयांना विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.

मागेल त्याला विहीर असून योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

Magel Tyala Vihir Anudan Yojana Subsidy

  • विहीर असून योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे असून देण्यात येते

विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदावी याबाबत माहिती

  • दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से.मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
  • नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
  • जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
  • नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण
  • माती नसावी.
  • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात .
  • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
  • नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
  • अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदु नये याबाबत माहिती

  • भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
  • डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.
  • मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)
  • विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करुनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांध जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇

Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

राम मंदिर ट्रस्टचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अधिकृत अकाउंट तयार करण्यात ...
पुढे वाचा
KreditBee Loan ॲपवरून 40 हजार रुपये पर्सनल लोन कसा मिळवायचा? | Kreditbee  40k personal loan online apply

KreditBee Loan ॲपवरून 40 हजार रुपये पर्सनल लोन कसा मिळवायचा? | Kreditbee 40k personal loan online apply

वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पर्सनल लोन मिळवणे आता खूप ...
पुढे वाचा
ट्रक पडला ट्रॅक्टरवर, विचित्र अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पहा व्हिडिओ

ट्रक पडला ट्रॅक्टरवर, विचित्र अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पहा व्हिडिओ

राजस्थानमधील जयपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका भयंकर अपघाताची घटना समोर आली ...
पुढे वाचा
groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 👇👇 groww ...
पुढे वाचा
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...
पुढे वाचा
Land area calculator|जमीन मोजणी करण्यासाठी एप्लीकेशन.

Land area calculator|जमीन मोजणी करण्यासाठी एप्लीकेशन.

Jaminichi Mojani Mobile Aap आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये gps area ...
पुढे वाचा
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानात आता ४० टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व ...
पुढे वाचा
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
पुढे वाचा
Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून ...
पुढे वाचा

Leave a Comment