बीबीएफ (BBF) यंत्राद्वारे शेतीचे काम उत्तमोत्तम होताना दिसते. या योजनेच्या ( Perni Yantra Yojana ) माध्यमातून हे यंत्र खरेदीसाठी किती अनुदान लागेल याबाबत माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. अशातच मूळ यंत्राच्या किंमतीतून ५० % दरात सूट मिळेल.
पेरणी यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇👇👇
बीबीएफ पेरणी पद्धतीचे फायदे
- पावसाचे पाणी सऱ्यामध्ये मुरते त्यामुळे त्यामुळे त्याठिकाणी पाण्याचे संवर्धन होऊन दीर्घकाळासाठी याचा फायदा होतो.
- अधिकच्या मोठ्या पावसामुळे पाण्याचा योग्य निचरा होऊन रुंद वरांबा तसेच दोन्ही बाजूंनी सरी यामुळे पिकासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.
- मजुरांची तसेच वेळेची जवळपास 50-60 टक्के बचत होते.
- सरासरी प्रतिदिन 5-6 हेक्टर बीबीएफ पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करता येते.
- पिकांतील अंतर जास्त असल्याकारणाने पिकाची अंतर मशागत करणे एकदम सोपे होते.
बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अनुदान किती ?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. बीबीएफ पेरणी यंत्रासाठी खरेदी किमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 35 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने MahaDBT फॉर्मर पोर्टलवर्ती अर्ज सादर करावा लागेल.
पेरणी यंत्रासाठी अशा प्रकारे अर्ज करा.
महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन पेरणी यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇👇
www.mahadbt.com या लिंकवर जाऊन आपण अर्ज भरू शकता. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकाच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे. अधिक पाऊस झाल्यास किंवा कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास त्याचा निचरा अतिशय योग्य प्रकारे करण्यास मदत होते.
यामुळे अधिक पावसात पाणी साचून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर केल्यामुळे पेरणीसाठी कमी वेळ लागतो. योग्य प्रकारे दोन ओळीतील अंतर ठेवल्यास आंतरमशागतही करता येते. त्याचप्रमाणे या यंत्राचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा.
राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी कोणतीना कोणती योजना उपलब्ध करून देत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामात होताना दिसतो. या मशिनद्वारे कमी प्रमाणात पाऊस, अधिक प्रमाणात पाऊस, पावसाचा खंड असेल तरीही बीबीएफ (BBF) यंत्राद्वारे शेतीचे काम उत्तमोत्तम होताना दिसते.
BBF पेरणी यंत्रासाठी किती अनुदान मिळणार ?
BBF पेरणी यंत्रासाठी जास्तीत जास्त 35,000 रु. अनुदान किंवा खरेदी रक्कमेच्या 50% अनुदान देण्यात येणार.
बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
ही बीबीएफ पेरणी यंत्र योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
बीबीएफ पेरणी यंत्रासाठी अर्ज कसा करावा ?
बीबीएफ पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन MahaDBT Farmer पोर्टलवर अर्ज करावं लागेल, यासाठीच्या व्हिडिओची लिंक वरील रखान्यामध्ये देण्यात आली आहे.