व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

अर्ज कुठे व कसा करायचा?

शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कुटुंबानं तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.

एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. यात स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मयताचं नाव, त्यांच्यासोबतचं नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं कारण, तारीख लिहायची आहे.

अपघातात मृत्यू झाला की अपंगत्व आलं, तेही लिहायचं आहे.

पुढे ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ लाभ मिळावा, असंही लिहायचं आहे.

ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यास महसूल, पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांचं पथक प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देवून चौकशी करेल आणि 8 दिवसांच्या आत आपला अहवाल तहसीलदारांना देईल.

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती 30 दिवसांच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय घेईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

या योजनेसाठीच्या अर्जासोबत मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा सरकारी कागद जसं की FIR, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय, पुढील कागदपत्रं जोडावी.

  • सातबारा उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद
  • शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
  • मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल
  • वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक

Leave a Comment

error: Content is protected !!