प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला व फळपिकासाठी प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी अनुदान देणारी एकमात्र योजना म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना होय.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की, Plastic Mulching Paper Yojana काय आहे ? अनुदान किती दिलं जातं ? अर्ज कसा करावा ? पात्रता व कागदपत्र इत्यादी संपूर्ण माहिती.

Plastic Mulching Paper Yojana Maharashtra

महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळपिकाची लागवड केली जाते. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना Mahadbt पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.

भाजीपाला व फळझाडांसाठी प्लास्टिक आच्छादन असल्यास पाण्यामुळे होणारा बाष्पीभवनाचा त्रास कमी होतो, त्याचप्रमाणे पिकावरील कीड, रोगराई इत्यादीपासून पिकांचे संरक्षण होते, त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

प्लास्टिक मल्चिंग पेपर Subsidy in Maharashtra

शेतकऱ्यांचा प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी वाढता वापर पाहता शासनाकडून 50% अनुदान दिलं जात. सामान्यता प्रति एकर प्लास्टिक मल्चिंग पेपरचा खर्च जर पाहिला, तर 32,000 रुपये इतका येतो. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 50% अनुदान शासनाकडून दिले जातं, म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टरसाठी अनुदान मिळणार आहे.

अनुदानाची रक्कम मर्यादा ही दोन हेक्‍टरपर्यंत ठरविण्यात आलेली असून डोंगराळ भागासाठी वाढीव खर्च 36 हजार 800 याप्रमाणे 50% अनुदान त्या भागातील शेतकऱ्यांना दिला जातो. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट इत्यादींना अर्थसाह्य केलं जातं.

मल्चिंग पेपरची पीकनिहाय जाडी

मल्चिंग पेपरची जाडी ही पिकाच्या कालावधीनुसार ठरविण्यात येते. विविध फळ पिकांसाठी, भाजीपाल्यांसाठी ही जाडी वेगवेगळी असू शकते. कालावधीनुसार मल्चिंग पेपरची जाडी तुम्ही खालील प्रमाणेपाहू शकता.

  • 3-4 महिना पीक कालावधी : 25 मायक्राँन
  • 4-12 महिना पीक कालावधी : 50 मायक्राँन
  • 12 महिन्यावरील पीक कालावधी : 100 किंवा 200 मायक्राँन

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

  • अर्जदारांचा आधारकार्ड
  • आधार सलग्न बँक पासबुक
  • जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा
  • शेतीतील पिकांची माहिती

प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी अनुदान किती दिलं जातं ?

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जात, ज्याची कमाल मर्यादा 16 हजार रुपये पर्यंत असेल.

Plastic Mulching Paper Price काय असेल ?

प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या किमतीसाठी तुम्हाला जवळील दुकानांमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये याच्या किमती पहाव्या लागतील; कारण स्थाननिहाय व विक्रेतानिहाय किमती वेगवेगळ्या असू शकतात.

मल्चिंग पेपर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ?

मल्चिंग पेपर अनुदानासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अनुदान मिळू शकतात. अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
पुढे वाचा
मोबाईल वरून हवामान अंदाज कसा पाहायचा | तुमच्या फोनमध्ये ॲप घेऊन हवामान अंदाज पहा

मोबाईल वरून हवामान अंदाज कसा पाहायचा | तुमच्या फोनमध्ये ॲप घेऊन हवामान अंदाज पहा

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा या हवामान अंदाज च्या पेजवर ...
पुढे वाचा
महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

पिक विमा महाराष्ट्र राज्य 2023 च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो ...
पुढे वाचा
तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण मतदान कार्ड मोबाईल वरून pdf ...
पुढे वाचा
रबी हंगामातील पिक विमा घरच्या घरी मोबाईल द्वारे  भरा |१ रुपयात पिक विमा योजना.

रबी हंगामातील पिक विमा घरच्या घरी मोबाईल द्वारे भरा |१ रुपयात पिक विमा योजना.

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या एक रुपयात पिक ...
पुढे वाचा
1 लाखात कार तर 10 हजारात बाईक खरेदी करा. बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Union Bank

1 लाखात कार तर 10 हजारात बाईक खरेदी करा. बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Union Bank

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायचे आहे का, येथे मिळतंय कार ...
पुढे वाचा

Leave a Comment