रेशनकार्ड संपूर्ण माहिती|रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. |Download ration card

Ration Card : आता राहण्याचे ठिकाण जाणून घेण्यासाठी आधारकार्डचा अधिकृत वापर सुरु आहे. पण पूर्वी शिक्षापत्रिका, रेशनकार्डचे महत्व होते. केवळ धान्यच मिळविण्यासाठी नाही तर यासाठी पण रेशनकार्डचा वापर होत होता.

 देशात आजही रेशन कार्डचे महत्व कमी झालेले नाही. शिधा पत्रिका (Ration Card) केवळ धान्य मिळविण्यासाठीच वापरण्यात येते असे नाही. तर नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी रेशन कार्ड गरजेचे होते. आजही शिधापत्रिकेची गरज धान्य घेताना पडतेच. रेशन कार्ड दाखवावे लागतेच. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. सरकारच्या शिधा संबंधीच्या योजनेदरम्यान हे कार्ड दाखवावे लागते. बँकेत खाते उघडण्यासाठी, शाळा, महाविद्यालयात घराचा पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्डचा आजही वापर करण्यात येतो. रेशनकार्डचे विविध प्रकार (Types of Ration Card) असतात. त्याचे रंग ही वेगवेगळे असतात. गरीब कुटुंबांना या आधारे महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते.

तुमचे रेशन कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

आधार पूर्वी महत्वाचा दस्तावेज
आधार कार्ड पूर्वी रेशनकार्डला मोठे महत्व होते. नागरिकत्व, ओळख पटविण्यासाठी पूर्वी रेशनकार्डचा वापर होत असे. गरीबच नाही तर श्रीमंतांना पण रेशन कार्ड घ्यावे लागत असे. बँका, शाळा, पासपोर्ट, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठा शिधा पत्रिकेचा वापर होत होता. देशातील विविध राज्यात रेशन कार्डबाबत वेगवेगळी धोरण आहेत. तसेच सरकारी योजनांचे फायदे पण राज्यपरत्वे बदलतात.

किती प्रकारचे कार्ड
भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त चार प्रकारचे रेशन कार्ड असतात. या 4 रेशन कार्डची ओळख त्यांच्या रंगानुसार होते. निळे (Blue), गुलाबी(Pink), पांढरे (White) आणि पिवळ्या (Yellow) रंगाचे रेशन कार्ड असते. उत्पन्न गटानुसार, मिळकत, कमाईनुसार हे रेशन कार्ड देण्यात येते.

  • निळे-हिरवे-पिवळे कार्ड
    दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी, गरीब लोकांसाठी रेशन कार्ड निश्चित केलेले आहे. निळे, हिरवे आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड त्यांच्यासाठी असते. प्रत्येक राज्यानुसार, रेशन कार्डचा रंग निश्चित असतो. ज्या कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन पण नाही, त्यांना हे निळे, हिरवे, पिवळे रेशन कार्ड देण्यात येते.
  • उत्पन्न मर्यादा
    ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये असेल तर त्यांच्यासाठी दारिद्रय रेषेखालील शिधा पत्रिका असते. शहरी भागासाठी ही उत्पन्न मर्यादा जास्त आहे. शहरात वार्षिक 11,850 रुपये उत्पन्न गटातील कुटुंबांना हे रेशन कार्ड मिळते.
  • केसरी रेशनकार्ड
    गुलाबी रेशन कार्ड, सामान्य कुटुंबांसाठी आहे. एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्रय रेषेखालील कुटुंबांपेक्षा अधिक असते. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्न 6400 रुपये तर शहरात वार्षिक 11,850 रुपये उत्पन्न गटापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना केसरी रेशनकार्ड मिळते.
  • पांढरे रेशन कार्ड
    जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड देण्यात येते. या कुटुंबांना सबसिडीयुक्त अन्नधान्याचा कुठल्याच लाभाची गरज नसते. या रेशनकार्डचा वापर जास्त करुन ओळख पटविण्यासाठी करण्यात येते. हे रेशन कार्ड देशातील कोणताही नागरीक घेऊ शकतो. स्वस्त धान्यासाठी या कार्डचा काहीच वापर होत नाही.

तुमचे रेशन कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 👇


पिवळ्या रेशन कार्ड चे फायदे व पात्रता

पिवळे रेशन कार्ड हे महाराष्ट्र सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. ते अनुदानित किंमतीत खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू मिळविण्यासाठी वापरले जाते. या लेखात आपण पिवळ्या रेशन कार्डच्या फायद्यांवर आणि पात्रतेवर चर्चा करणार आहोत.

पिवळ्या रेशन कार्डचे फायदे:

  • अनुदानित किंमतीत खाद्यपदार्थ: पिवळ्या रेशन कार्ड धारकांना खाद्यतेल, साखर, गहू, तांदूळ आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थ कमी किमतीत मिळतात. यामुळे कुटुंबाला आर्थिक बचत होते.
  • इतर अनुदानासाठी पात्र: पिवळ्या रेशन कार्ड धारक इतर सरकारी योजनांच्या अनुदानासाठी पात्र असतात. जसे, शैक्षणिक शुल्क माफी, वयोवृद्धांसाठी पेन्शन, विधवांसाठी आर्थिक मदत इ.
  • ओळखीचा पुरावा: पिवळे रेशन कार्ड हे सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र आहे. ते पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादीसाठी ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते.
  • राहण्याचा पुरावा: पिवळे रेशन कार्ड हे राहण्याचा पुरावा म्हणून देखील वापरता येते. हे लँडलाईन कनेक्शन, सिम कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक आहे.
  • एलपीजी गॅस कनेक्शन: पिवळ्या रेशन कार्ड धारक नवीन एलपीजी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात.
  • विमा योजनांसाठी पात्र: पिवळ्या रेशन कार्ड धारक काही सरकारी विमा योजनांसाठी पात्र असतात. जसे, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना.

पिवळ्या रेशन कार्डसाठी पात्रता:

  • महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा पार करू नये. (मर्यादा जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक रेशन वितरण कार्यालयाशी संपर्क साधा)
  • इतर कोणत्याही रेशन कार्डची पात्रता नसणे.

वस्तूचे नांव     अंत्योदय      बीपीएल   प्राधान्य कुटुंब

तांदूळ.            ३.००             —            ३.००

गहू               २.००              —              २.००

भरड धान्य   १.००               —               १.००

साखर       २०.००.            –.                —

पिवळ्या रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा:

  • आपल्या जवळच्या रेशन वितरण कार्यालयाला भेट द्या.
  • अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  • कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आपल्याला पिवळे रेशन कार्ड मिळेल.

निष्कर्ष:

पिवळ्या रेशन कार्डचे अनेक फायदे आहेत. ते गरीब आणि गरजू लोकांसाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे. जर आपण पिवळ्या रेशन कार्डसाठी पात्र असाल, तर आपल्या जवळच्या रेशन वितरण कार्यालयाशी संपर्क साधा आणि अर्ज करा.

Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

PVC आधार कार्ड कसे बनवायचे? यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर ...
पुढे वाचा
पुलावरून जाणार होता मोठा ट्रक, अचानक कोसळला पुल, काय झालं पहा व्हिडिओ

पुलावरून जाणार होता मोठा ट्रक, अचानक कोसळला पुल, काय झालं पहा व्हिडिओ

व्हिएतनाममध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ यागी मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी ...
पुढे वाचा
हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

पंजाबराव डख हे हवामान खात्याचे प्रसिद्ध अभ्यासक असून त्यांनी शेतकऱ्यांना ...
पुढे वाचा
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
पुढे वाचा
कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

शेतकरी बांधवांनो! आज महाराष्ट्रात घेतले जाणारे कलिंगड पीक जाणून घेऊया ...
पुढे वाचा
गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान साठी अर्ज कुठे करावा ? ...
पुढे वाचा

Leave a Comment