Low Cibil Score personal loan
CIBIL Score : तुमचा CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल आणि तुम्हाला वैयक्तिक कर्ज (personal loan) घ्यायचे असेल तर कर्ज मिळेल का? तर अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तर तुम्ही कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. कारण खराब क्रेडिट स्कोअर असतानाही तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्ज personal loan घेऊ शकता. याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Low cibil Personal loan
Low Cibil Score:- बरेचदा आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व तेव्हा आपण बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्याकरिता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करतो किंवा वैयक्तिक कर्ज मागतो.
परंतु यामध्ये बँकांच्या माध्यमातून किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात अगोदर तपासला जातो. मागील काळातील काही कर्जामुळे personal loan किंवा इतर काही गोष्टींमुळे जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला किंवा खराब असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज नाकारले जाते.
त्यामुळे अशा परिस्थितीत खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे मनामध्ये नक्कीच विचार येतो की आता अशी कुठली पद्धत वापरता येईल की ज्यामुळे आपल्याला सिबिल स्कोर खराब असताना देखील बँक किंवा वित्तीय संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज(personal loan) मिळू शकेल. अगदी याच संबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
कमी असलेला सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काय करावे हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
Get personal loan on low credit score
खराब CIBIL स्कोर असल्यास वैयक्तिक कर्ज उपलब्ध होत नाही. मात्र, हे योग्य नाही. असे अनेक उपाय आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही खराब क्रेडिट स्कोअर असतानाही सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की क्रेडिट स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान आहे. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. जर तुमचा CIBIL स्कोर यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला कर्ज घेण्यात अडचण येते. जर रक्कम कमी असेल तर कर्ज मिळत नाही.
तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे चेक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
या पद्धतींचा अवलंब करा आणि खराब सिबिल असताना देखील कर्ज मिळवा
1- सह स्वाक्षरीदार किंवा हमीदराची मदत घेऊन– जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्ही सह स्वाक्षरीदार किंवा हमीदाराची मदत घेऊन कर्ज loan मिळवू शकतात. याकरिता जर तुम्ही सह स्वाक्षरीकर्त्याची मदत घेतली व कर्जासाठी अर्ज केला तर बँकेच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट स्कोरचा विचार केला जातो.
व त्याचप्रमाणे ग्यारंटी असल्यास आपण कर्जाच्या पेमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता करणार नाही असा बँकेचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यामुळे ही पद्धत तुम्हाला क्रेडिट स्कोर खराब असताना देखील वैयक्तिक कर्ज मिळवून देऊ शकते.
एक लाख रुपयांचे कर्ज कमीत कमी कागदपत्रांमध्ये फक्त पाच मिनिटात मंजूर करा.👈
2- एखादी मालमत्ता गहाण ठेवून– क्रेडिट स्कोर जर खराब असेल व तुम्हाला जर कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही एखादी मालमत्ता गहाण ठेवून वैयक्तिक कर्ज या माध्यमातून मिळवू शकतात. यामध्ये अशी गहाण मालमत्ता जामीनदारासारखे काम करते. याकरिता तुम्हाला काही मालमत्ता बँकेकडे तारण ठेवणे गरजेचे असते जी तुमच्या personal loan कर्जासोबत जोडली जाते.
3- सॅलरी स्लिप दाखवून– यातील सगळ्यात महत्त्वाचा एक तिसरा पर्याय म्हणजे समजा तुम्ही नोकरी करत असाल व तुम्हाला सॅलरी स्लिप मिळत असेल तर तुम्ही तुमच्या पगाराची स्लिप म्हणजेच सॅलरी स्लिप बँकेला दाखवून personal loan घेऊ शकतात.
जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल तरी बँका तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवल्यावर सहजपणे personal loan मंजूर करतात. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर अशा व्यक्तींसाठी ही पद्धत खूप फायद्याची आहे.
त्यामुळे जर सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तुम्ही या तीनही पद्धती एका पद्धतीचा वापर करून कर्ज मिळवू शकतात.