कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम अर्जदाराला शासनाच्या Mahadbt पोर्टलवर जाऊन नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडून रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.
- आता युजर नेम आणि पासवर्ड किंवा आधारकार्ड ओटीपी टाकून लॉगीन करायचं आहे.
- लॉगीन केल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला विविध प्रकारच्या योजना दिसत असेल.
- कडबा कुट्टी अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषि यांत्रिकीकरण या योजनेवर क्लिक करावे लागेल. आता कृषि यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज ओपन झालेला दिसेल.
- त्यामध्ये तुम्ही कृषि यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला कडबाकुट्टी नावाचा ऑप्शन निवडावा लागेल.
- जर तुम्हाला मानवचलित यंत्र हवे असेल तर मानवचलित यंत्र अनुदान ऑप्शनवर क्लिक करा. जर तुम्हाला ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र हवे असेल तर ट्रॅक्टरचलित अवजारे या ऑप्शनवर क्लिक करा.
- ट्रॅक्टरचलित कुट्टी योजनेसाठी अर्जदाराकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- अर्ज करण्यासाठी पेमेंट ऑनलाईन करावे लागेल. पेमेंट केल्यावर त्यासंबंधीचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल.
- योजनेसाठी निवड झाल्यावर तुम्हाला त्यासंदर्भातील एसएमएस प्राप्त होईल.
- यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
- त्यानंतर मशीन खरेदी करून अनुदानाची मागणी तुम्हाला करावी लागेल.
कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇