महत्त्वाचे
3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात.
पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला एकूण पंपाच्या किंमतीच्या 90 % एवढं अनुदान दिलं जातं.
पात्र अर्जदार अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला एकूण पंपाच्या किंमतीच्या 95 % अनुदान दिलं जातं.
उरलेली रक्कम संबंधित पात्र लाभार्थ्याला लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागते.
कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करा.👇👇
कुसुम सोलर योजनेअंतर्गत पात्र गावांची यादी पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇👇
अनुदान कसं दिलं जातं?
महाराष्ट्र सरकारच्या महाऊर्जा बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार,
3 एचपी पंप
एकूण किंमत – 1,93,803 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा– 19,380 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -9,690 रुपये
5 एचपी पंप
एकूण किंमत– 2,69,746 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 26,975 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -13,488 रुपये
7.5 एचपी पंप
एकूण किंमत – 3,74,402 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 37,440 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -18,720 रुपये
पंपासाठी जमिनीचा निकष काय?
- अडीच एकरपर्यंत जमीन धारकास – 3 एचपी पंप
- अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन धारकास – 5 एचपी पंप
- 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास – 7.5 एचपी पंप
पात्रतेचे निकष आणि कागदपत्रे
या योजनेसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्राणे आहेत-
1. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
2. शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
3. अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
कागदपत्रे
1. सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
2. सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
3. आधार कार्ड
4. जातीचा दाखला
5. बँक पासबुक फोटो
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
या योजनेसाठी नोंदणी कशी करायची?
पीएम कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी mahaurja.com असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरचण ही वेबसाईट ओपन होईल.
उजवीकडे “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” हा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना दिसेल, ती वाचून क्लोज करायची आहे.
उजवीकडे “सिलेक्ट लँग्वेज” या पर्यायावर क्लिक करून मराठी भाषा निवडायची आहे.
‘’पीएम कुसुम योजना : लाभार्थी नोंदणी” हा अर्ज ओपन होईल.
सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात का?, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. इथं होय किंवा नाही उत्तर निवडायचं आहे.
‘होय असेल तर पंपाच्या उर्जेचा स्रोत, त्याचा प्रकार, उपप्रकार, किती क्षमतेची, वर्षाला किती लीटर डिझेल लागतं ते सांगायचं आहे.
त्यानंतर ‘’ अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती ’’ भरायची आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे. मोबाईल क्रमांक, आणि जात वर्गवारी निवडायची आहे
‘जर तुमच्या जिल्ह्यातील क्वोटा संपला असेल तर तशाप्रकारची सूचना तुम्हाला तिथं दिसेल. कोटा उपलब्ध असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्जासाठी भरणा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. पुढे मग तुम्हाला पंपाचा तपशील आणि तुमच्या जिल्ह्यात तुम्ही निवडलेल्या प्रवर्गासाठी किती क्वोटा उपलब्ध आहे ते दाखवलं जाईल. इथं तुम्हाला लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया यावर क्लिक करायचं आहे.
पुढे तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन आयडी दिला जाईल आणि नोंदणी फी 100 रुपये सांगितलं जाईल. पुढे आल्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्याचे वेगवगेळे पर्याय दिसतील.इथं सुरुवातीला तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर ही माहिती टाकायची आहे. आणि मग पेमेंट करायचं आहे.
पेमेंट झाल्याचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर यूझरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल आणि तुमची नोंदणी पूर्ण होईल.
.
पण ही झाली या योजनेसाठीची ही प्राथमिक नोंदणी. तुमच्या जिल्ह्यातील कोटा उपलब्ध झाल्यावर अर्जदाराला तसं SMS द्वारे कळवण्यात येईल.
त्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरणे, क्वोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्वीकारणं, कंपनी निवडणं आणि सौर पंप वाटप करणं ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं महाऊर्जाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी कोटा उपलब्ध?
पीएम कुसुम योजनेअंतर्गत सध्या राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये सौर पंपासाठींचा कोटा उपलब्ध असल्याचं महाऊर्जाच्या वेबसाईटवर दिसून येतं.
- ऑफिसियल वेबसाइट
- Online Apply PM कुसुम योजना 2023 वेबसाइट
कोटा उपलब्ध असलेले हे जिल्हे आहेत-
अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नागपूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.
अहमदनगर, औरंगाबाद, बुलढाणा, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, मुंबई, मुंबई उपनगर,नांदेड, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर.
पीएम कुसुम सोलार योजनेबाबत तुम्हाला काही प्रश्न किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही 020-3500 0450 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.