नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पात्र👇
- पी एम किसान योजनेचे नियमित लाभ घेत असलेले सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.
- ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2019 च्या अगोदर पासून शेत जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
- पी एम किसान योजनेसाठी पात्र असून नोंदणी न केल्यामुळे लाभ न घेणारे शेतकरी या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ घेऊ शकतात.
- पी एम किसान योजनेअंतर्गत मागील हप्ते ज्यांना मिळालेले शेतकरी ज्यांचा काही प्रॉब्लेम असल्याने लाभ न मिळालेले शेतकरी दुरुस्ती करून लाभासाठी पात्र आहेत.
या तारखेला पैसे मिळणार
नमो शेतकरी महासन्मान योजना या महिन्याच्या अखेरपर्यंत च्या कालावधीमध्ये सुरू करण्याचे आश्वासन देखील महाराष्ट्र सरकारने जनतेला दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
यामुळे शासनाच्या आश्वासनानुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी महासंघ चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अशी शेतकरी या योजनेस पात्र ठरत नाहीत त्यामुळे आपण पीएम किसान योजना चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देऊन ही योजना चालू करून घ्यावी.
जर पी एम किसान योजनेचा आपल्या मिळत असेल तर आपल्याला नमो शेतकरी महासंघाने योजनेचा लाभ मिळेल.
CM Kisan Yojana documents-मुख्यमंत्री किसान योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा उतारा / 8अ उतारा
- रहिवासी पुरावा
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे)
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला