व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

Cibil Score Check on Whatsapp :

आपल्यापैकी अनेकांना कर्जाची आवश्यकता भासत असते. आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण कर्ज काढत असतो. नवीन घर खरेदी करण्यासाठी, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा मग इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण लोन घेतात. जर आपण याआधी एखाद्या बँकेकडून अथवा फायनान्स कंपनीकडून किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले असेल तर आपणास सिबिल स्कोर संदर्भात माहिती असेलच.

व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा याची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मात्र जर आपण आतापर्यंत कोणतच कर्ज बँकेच्या माध्यमातून घेतलेल नसेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कर्ज मंजूर करताना, लोन देतांना बँकांच्या माध्यमातून सिबिल स्कोर प्रथम चेक केला जातो. Bank सरकारी असो किंवा खाजगी बँका कर्ज देण्यापूर्वी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल चेक करत असतात. एकंदरीत सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी अति महत्त्वाचा घटक ठरतो.

या घटकाच्या आधारेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कर्ज मंजूर होत असतं. हा स्कोर ज्या व्यक्तीचा चांगला असतो त्याला लगेचच कर्ज मंजूर होतं आणि व्याजदर देखील कमी आकारला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो अशा व्यक्तीना लवकर कर्ज मंजूर होतं म्हणजेच अशा व्यक्तीचा सिबिल स्कोर हा चांगला असल्याचे मानले जाते.

खरं पाहता, सिबिल स्कोर ऑनलाइन पद्धतीने देखील चेक केला जातो. यासाठी सिबिलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. आपण www.cibil.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन सिबिल स्कोर चेक करू शकता.

सिबिल स्कोर ऑनलाइन चेक करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

मात्र आज आपण व्हाट्सअप वर कशा पद्धतीने सिबिल स्कोर चेक करायचा हे जाणून घेणार आहोत.

पण जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा 650 पेक्षा कमी असेल तर अशा व्यक्तीला कर्ज देताना बँकांच्या माध्यमातून टाळाटाळ होत असते. किंवा अशा व्यक्तींना कर्ज जर मंजूर झालं तर कमी कर्ज मंजूर होतं आणि अधिक व्याजदर आकारला जातो. एकंदरीत कर्ज आणि त्यावरील व्याजदर ठरवण्यासाठी सिबिल स्कोर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दरम्यान आज आपण सिबिल स्कोर whatsapp वर कशा पद्धतीने चेक केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.

Cibil Score चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • तुम्हालाही तुमचा Cibil Score तपासायचा असेल, तर त्यासाठी प्रथम Google Play Store वरून WhatsApp ॲप्लिकेशन डाऊनलोड करा. 
  • तुमच्याकडे आधीपासून हे ॲप असेल तर अपडेट करून घ्या.
  • आता तुम्ही +91-9920035444 हा नंबर सेव्ह करा. 
  • हा नंबर सेव्ह केल्यानंतर व्हाट्सअपवरून ‘Hey’ असा मॅसेज पाठवा. (cibil score check whatsapp number)
  • त्याऐवजी तुम्ही बारकोड स्कॅन देखील करू शकता. तशीही तरतूद केली आहे. how to check credit score free 
  • यानंतर तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर यासारखी माहिती शेअर करावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर स्कोअर व्हॉट्सॲपद्वारे मिळून जाईल. (Credit Score Check Free Online)
  • अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअपवरून सिबिल स्कोअर तपासू शकता

व्हाट्सअप वर क्रेडिट स्कोर सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये:


कधीही, कुठेही क्रेडिट स्कोअर चेक करता येणार: या नवीन सेवेद्वारे, ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आणि उपस्थित ठिकाणी त्यांचा क्रेडिट स्कोअर पाहता येणार आहे आणि ग्राहकांसाठी हा नक्कीच सोयीस्कर पर्याय आहे.

जलद आणि सुरक्षित: ही सेवा जलद, सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी, डिझाइन केलेली असल्याच एक्सपेरियन इंडिया ने सांगितल आहे.

मोबाईलवर ऑनलाइन सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

ग्राहक या सेवेच्या माध्यमातून नियमितपणे त्यांच्या क्रेडिट स्कोअर चे निरीक्षण करून कुठल्याही अनियमित प्रकाराला त्वरीत ओळखू शकतात. जेणेकरून फसवणुकीच्या घडल्याच तर ग्राहकांना त्वरित त्याबद्दल समजू शकेल.

क्रेडिट स्कोर सर्विस बद्दल कंपनीची भूमिका


एक्सपेरियन इंडियाच्या या उपक्रमावर भाष्य करताना, एक्सपेरियन इंडियाचे कंट्री मॅनेजर नीरज धवन म्हणाले, “ग्राहकांना क्रेडिट माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि भारतात मजबूत क्रेडिट इकोसिस्टम तयार व्हावी अशी आमची इच्छा आहे. अशा प्रकारची सेवा देणारे भारतातील पहिले क्रेडिट ब्युरो म्हणून समोर येणारे एक्सपेरियन इंडिया पहिले आहे.”

एक्सपेरियन इंडिया, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) कायदा 2005 अंतर्गत परवाना मिळवलेला देशातील हा पहिलाच क्रेडिट ब्युरो आहे. आता एक्सपेरियन इंडियाच्या या उपक्रमासह भारतीय ग्राहकांना WhatsApp द्वारे त्यांचा क्रेडिट स्कोअर अगदी विनामूल्य तपासता येणार आहे. आता ग्राहक त्यांचा क्रेडिट स्कोअर तपासून त्यांच्या पोर्टफोलिओ वर सहज लक्ष ठेवू शकतात.

अधिकृत निवेदनात, एक्सपेरियन इंडियाच्या मॅनेजर नी ठळकपणे सांगितले की, भारतातील क्रेडिट ब्युरोमध्ये अशा प्रकारच्या सेवेचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ही सेवा ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअर ची त्वरित माहिती उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: 10 लाख रुपये कर्ज आणि 35 टक्के सबसिडी!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: 10 लाख रुपये कर्ज आणि 35 टक्के सबसिडी!

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ...
पुढे वाचा
रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

नवीन रेशनकार्ड साठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत | ऑनलाइन रेशन ...
पुढे वाचा
लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे ...
पुढे वाचा
PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ...
पुढे वाचा
गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...
पुढे वाचा
मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईलवरून जमीन मोजण्याची सोपी पद्धत! आता जमीन मोजा मिनिटांत! Jamin ...
पुढे वाचा
ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत.

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत ट्रॅक्टर खरेदीसाठी बिनव्याजी ...
पुढे वाचा

Leave a Comment