कामात अडथळा किंवा काम होत नाही का, अशी करा पंतप्रधान मोदींकडे तक्रार. | PMO india complaint.

Complaint direct to PM Modi

 जर तुम्हाला एखाद्या सरकारी विभागाच्या कामकाजाबाबत किंवा सरकारी योजनेच्या अंमलबजावणीबाबत तक्रार करायची असेल तर तुम्ही पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) माध्यमातून पंतप्रधान मोदींकडे तक्रार करू शकता.

आपल्या जीवनात आपल्याला बरीचशी सरकारी कामे करावी लागतात. सरकारी कार्यालयांमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव विलंब होतो. आपण वैतागून शेवटी वैष्ट अधिकाऱ्यांशी किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल करतो परंतु आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते.

आपल्या तक्रारी कडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपण निराश होतो आणि आपले काम रखडले जाते. परंतु आता चिंता करण्याचे काम नाही. कारण आता आपल्याला होणाऱ्या त्रासाची किंवा समस्येची तक्रार आता आपण थेट पंतप्रधान कार्यालयात नोंदवू शकतो.

जर तुम्ही एकदा पंतप्रधान कार्यालयात तक्रार दाखल केली तर योग्य ती कारवाही होणारच. आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वैताग होणार नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही ही तक्रार ऑनलाइन करू शकता. चला तर आपण पाहूया पंतप्रधान कार्यालयात तक्रार कशी करावी…

तुमचा सिबिल स्कोर मोफत चेक करा. 👇

पंतप्रधान कार्यालयात तक्रार कशी करायची ?

  • पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावर क्लिक करा
  • त्यानंतर ‘चॅट विथ द प्राइम मिनिस्टर’ या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला पंतप्रधानांना पत्र लिहण्याची पर्याय दिसेल.
  • यानंतर ‘CPGRAMS’ चे पेज ओपन होईल.
  • त्यानंतर येथे तक्रार नोंदवा, तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होईल.
  • तक्रारी संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे.
  • आपल्या विनंतीची किंवा तक्रारीची माहिती येथे भरा म्हणजेच तुमची वयक्तिक आणि तक्रारीची माहिती भरा.

आपली तक्रार लिखित स्वरुपात काही कराल ?

  • जर तुम्हालाऑनलाइन तक्रार करायची नसेल, तर तुम्ही भारतीय टपाल विभागाद्वारे पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून तुमची तक्रार पाठवू शकता.
  • पत्राद्वारे तक्रार पाठवण्याचा पत्ता – पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली, पिन 110011
  • याव्यतिरिक्त तुम्ही फॅक्सद्वारे तुमची तक्रार पाठवू शकता. फॅक्स क्रमांक – 011-23016857

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करा. 👇

कारवाई कशी होते?

  • तक्रारी संबंधित योग्य टी चौकशी करुन त्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक टीम उपलब्ध आहे.
  • ती टीम विविध मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकार यांच्याशी संपर्क साधते.
  • तुमची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर चौकशी होते, तसेच तक्रार खरी आढळल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाते. Complaint direct to PM Modi

तक्रार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • तक्रार स्पष्ट आणि संक्षिप्तपणे लिहा.
  • आवश्यक माहिती आणि कागदपत्रांची जोडणी द्या.
  • तक्रारीचा मागोवा घेण्यासाठी क्रमांक नोंदवून ठेवा.

तक्रार निवारण प्रक्रिया:

  • तक्रार नोंदवल्यानंतर, तुम्हाला एक क्रमांक मिळेल.
  • तुमच्या तक्रारीची चौकशी संबंधित विभागाकडून केली जाईल.
  • तुम्हाला चौकशीच्या प्रगतीची माहिती ईमेल किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल.
  • तक्रार निवारणानंतर, तुम्हाला सूचित केले जाईल.

टीप:

  • तक्रार करताना शिष्टाचार आणि संयम राखा.
  • चुकीची माहिती देणे टाळा.
  • तक्रार निवारण प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇 अर्ज ...
पुढे वाचा
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी एक स्थिर गोठा (शेड) बांधण्यासाठी आर्थिक अनुदान ...
पुढे वाचा
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा. 1.हवामान ...
पुढे वाचा
पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झाले याची ...
पुढे वाचा
विहीर

विहीर अनुदान योजना 2023 |पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत खाली दिलेली आहे. 👇👇👇 ...
पुढे वाचा

1 thought on “कामात अडथळा किंवा काम होत नाही का, अशी करा पंतप्रधान मोदींकडे तक्रार. | PMO india complaint.”

Leave a Comment