एक नवीन व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एक तरुण स्थानकावर डान्स करत असताना एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचवतो.हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेत वृद्ध व्यक्ती धावत्या लोकलमधून उतरताना अचानक पडतो, मात्र तिथेच उपस्थित असलेल्या तरुणाने त्याच्या वेगवान कृतीने वृद्धाला मोठ्या अपघातापासून वाचवलं.
रेल्वे स्थानकावर डान्स करणं अत्यंत धोकादायक असतं. मात्र या प्रसंगात या तरुणाच्या उपस्थितीत व सावधगिरीने एका वृद्धाचा जीव वाचला. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी या तरुणाचं कौतुक केलं, तर काहींनी तोच वृद्धाच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे.
पहा व्हिडिओ
रेल्वे अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात मात्र हा प्रसंग सोशल मीडिया वर लोकांना विशेष वाटला आहे कारण पहिल्यांदाच रिलच्या नादात कोणाचा तरी जीव वाचला आहे.
सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे स्टेशनसारख्या धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मनोरंजन करणं किंवा रिल्स शूट करणं हे अत्यंत गैर आहे. रेल्वे प्रशासनाने आणि पोलीस विभागाने या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे
व्हिडिओमध्ये तरुणाच्या चपळाईमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी हे नक्कीच इतरांसाठी धडा असावा की अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरलं पाहिजे. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी प्रवाशांनी योग्य नियम पाळले पाहिजेत आणि कोणताही जीवघेणा धोका घेऊ नये.
सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा होत असून नेटकरीही या व्हिडिओवर आपली मतं मांडत आहेत. काही लोक या तरुणाचं कौतुक करताना दिसत आहेत तर काहींनी टीका पण केली आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे.