व्हिएतनाममध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ यागी मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरेकडील भागात शनिवारी एका महत्त्वाच्या पुलाच्या कोसळण्याने अनेकांचे जीवन धोक्यात आले. या घटनेत एक ट्रक आणि इतर वाहने नदीत पडली याचा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नुकतेच आलेले यागी हे वादळ आशियातील सर्वात शक्तिशाली वादळांपैकी एक ठरले असून, त्याने अनेक भागात मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. विशेषतः व्हिएतनामच्या उत्तरेकडील भागात याचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे लाम थाओ आणि ताम नॉन्ग जिल्ह्यांना जोडणारा फोंग चाऊ पूल कोसळला. या घटनेत एक ट्रक आणि काही वाहने लाल नदीत वाहून गेली आहेत.
पहा व्हिडिओ
Dramatic video captures the moment a truck plunged into a river after a bridge collapsed in Vietnam after heavy rains caused by Typhoon Yagi. pic.twitter.com/E8jmTrLgNs
— Al Jazeera English (@AJEnglish) September 9, 2024
पुलाचा एक भाग अचानक कोसळल्यानंतर ट्रक वाहून गेला, आणि या क्षणाचे थरारक दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. काही दुचाकीस्वार आणि इतर प्रवाशांनी त्वरित सावधगिरी घेतली, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. परंतु पुलावर असलेल्या काही वाहनांतील लोकांना वाचवणे अवघड ठरले. व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
सुपर टायफून यागी मुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. VnExpress च्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत ४९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किती जण बेपत्ता आहेत, याचे अचूक आकडेवारी मिळवणे कठीण आहे कारण काही वाहने पुलाखाली वाहून गेली आहेत.
या घटनेनंतर, अनेकांनी पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या दुर्घटनेवर संताप व्यक्त करत असे म्हटले आहे की, “हे मानवनिर्मित आपत्तीचे एक उदाहरण आहे.