अर्ज कसा करावा ?
प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल, तो अर्ज खालील बटन वर क्लिक करून करावा.
- सर्वप्रथम Plastic Mulching Paper Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती जायचं आहे. त्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.
- त्यानंतर नोंदणी करताना तुम्ही टाकलेला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- फलोत्पादन या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करून त्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर हा पर्याय शोधून निवडा.
- त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावरती मल्चिंग हवा आहे तो क्षेत्र टाकून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनासाठी अर्ज केला असेल, तर त्यामध्ये प्राधान्य निवडा प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा.
- तुम्ही जर या घटकांतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतकी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल.
अशाप्रकारे एकदम सोप्यापद्धतीने तुम्ही ऑनलाईन घरबसल्या प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेअंतर्गत 50 टक्यापर्यंत अनुदान मिळवू शकता.