व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेंर्तग ८६ लाख शेतकऱ्यांना १७२० कोटींचे आज होणार वितरण

Namo Shetkari Mahasanman Yojana:

पीएम किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या तयारीत आहे. दरम्यानच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत मागच्या दोन महिन्यांपासून सूचना करण्यात येत होत्या. यामध्ये राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.

कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरले आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.

केवायसी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

पीएम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली.

दरम्यान ९५ लाखापैकी मयत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यांपैकी ८२.५९ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषीविभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषीमित्र, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, बांधावर जाऊन १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आले.

यामध्ये बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यामध्ये ९.५८ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, २.५८ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, १.२९ लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे.(namo shetkari mahasanman yojana)

नमो किसानचा पहिला हफ्ता तारीख

दरम्यान राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्या मिळणार आहे. गुरुवारी (दि.२६ ) रोजी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे.

केवायसी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!