व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे संपूर्ण माहिती|how to download PAN card step by step information

NSDL pan card download

पॅन कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे किंवा हरवलेले पॅन कार्ड मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करायचे त्याच्या साठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.

सर्वप्रथम आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल पॅन कार्डच्या मागच्या बाजूला तुम्हाला एक पत्ता दिसेल त्यामध्ये NSDL किंवा UTITSL या दोन्हीपैकी एका ऑफिसचा पत्ता दिसेल.

आपल्या पॅन कार्ड कार्डच्या मागच्या बाजूला जर NSDL ऑफिस चा पत्ता असेल तर तुम्हाला गुगल वरती nsdl pan download असे सर्च करावे. त्याठिकाणी तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल

1) सर्वात आहे तुम्हाला खालील दिलेली लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडावी लागेल

NSDL पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

 2) लिंक उघडण्या आधी सर्व माहिती वाचून घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही.

3) लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडल्यानंतर तुम्हाला तिथे दोन पर्याय दिसतील एकनॉलेजमेंट नंबर आणि पॅन नंबर तर आपण सर्वात आधी पाहूया पॅन कार्ड नंबर द्वारे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे.

  • खाली फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम तुमचा पॅन कार्ड कार्ड नंबर टाकावा लागेल. नंतर आधार कार्ड टाका.
  • जन्म तारीख महिना व वर्ष टाका खालील चौकोनात क्लिक करा व captcha कोड टाका.
pan card online

pan card online

  • SUBMIT वर क्लिक करावे लागेल,
  • पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी/OTP जाईल तो वेरीफाय करा.
  • आणि ८ रु २६ पैसे पेमेंट करा नंतर तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड होईल.

8) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय किंवा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून पॅन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड फक्त एका मिनिटात मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

UTITSL PAN CARD DOWNLOAD

  • जर तुमच्या पॅन कार्ड च्या मागच्या बाजूला UTITSL ऑफिसचा पत्ता असेल तर गुगल मध्ये uti pan download असे सर्च करावे लागेल.
  • त्यामध्ये https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard हि साईट ओपन करावी.

UTI पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

UTITSL PAN CARD DOWNLOAD
UTITSL PAN CARD DOWNLOAD
  • प्रथम पॅन कार्ड नंबर टाकावा नंतर जन्मतारखेचा महिना व वर्ष टाका नंतर CAPTCHA कोड टाका आणि SUBMIT करा.
  • लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी OTP/ओटीपी जाईल तो टाकून वेरीफाय करा.
  • नंतर ८ रु २६ पैसे पेमेंट करा पेमेंट झाल्यानंतर आपले PAN Card डाऊनलोड होईल.

इतर आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी खाली क्लिक करा.👇👇

आधार कार्ड डाऊनलोड करा.

मोबाईलवर पॅन कार्ड काढा.

ऑनलाइन मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन्स काढा.

Acknowledgement नंबर चा वापर करून पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे.

1) पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेली लिंक तुमच्या मोबाईल मध्ये उघडा

2) लिंक उघडणे आधी खाली दिलेली सर्व माहिती वाचून घ्या.

3) लिंक उघडल्यानंतर Acknowledgement या पर्यायावर क्लिक करा.

4) तुमचा Acknowledgement नंबर टाका. जन्मतारीख टाका खाली संकेतांक दिला असेल तो टाका नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

5) त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड बद्दल ची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवायला विचारले जाईल तुमच्याकडे जे ही उपलब्ध असेल त्याच्यावर टिकमार्क करून ओटीपी पाठवायचा. 

6) ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून परत खाली टिकमार्क करून रिक्वेस्ट फॉर पॅनकार्ड बटणावर क्लिक करायचे किंवा सबमिट बटणावर क्लिक करायचे.

7) त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी 8.25 पैसे पेमेंट करावे लागेल ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायची. 

8) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय किंवा बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून पॅन कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यायचे.

9) अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड फक्त एका मिनिटात मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!