व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 5000 व 6000 रुपयांची आर्थिक मदत. | Pm matruvandana yojana.

केंद्र शासनाकडून देशाभरात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवली जात आहे .या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या अपत्त्यासाठी पाच हजारांचा लाभ मिळणार आहे . जर अपत्य मुलगी असल्यास सहा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे .जर तुमचे अपत्य 1 एप्रिल 2024 नंतर जन्मलेल्या दुसऱ्या अपत्यासाठी देखील पाच हजार रुपये दिले जाणार आहेत .पण बाळ साडेतीन महिन्याचे झाल्यावर लस टोचल्यानंतर ही रक्कम मिळणार आहे .तत्पूर्वी फक्त पहिल्या पदासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये दिले जाणार आहेत

योजनेची उद्दिष्टे

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना व स्तनदा मातांना ठेकेदारांकडून मजुरी कमी दिली जाते त्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो त्या नुकसान त्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून म्हणजेच जेणेकरून बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल व लागणाऱ्या आर्थिक हातभार लागेल. या हेतूने हा बदल या योजनेमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिला किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिला व सध्या लागू असलेल्या कोणत्याही समान योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही . ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील अशा सेविका, आरोग्य सेविका- सेवक ,आधीपरिचारिका ,प्राथमिक आरोग्य केंद्र- उपकेंद्रे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, नागरी भागासाठी तसेच अशी यंत्रणा मदतीसाठी असणार आहे. या विभागातील सर्व कर्मचारी कर्मचारी का तुम्हाला या योजनेअंतर्गत मदत करतील.

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी हवी असल्यास खालील बटनवर क्लिक करा.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
  • गर्भवती महिला आणि पतीचे स्वयं-घोषणा पत्र
  • पोर्ट्रेट फोटो
  • गर्भधारणा प्रमाणपत्र
  • मातेचे आधारसंलग्न राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे पासबुक झेरॉक्स
  • आरोग्य विभागाकडील नोंदणी कार्ड व बाळाचे लसीकरण नोंदणी कार्ड
  • बाळाचा जन्म दाखला

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रे(यापैकी कोणतेही एक)

  • वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला
  • अनुसूचित जाती- जमातीतील महिलांना जातीचा दाखला
  • ४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग महिला
  • बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला
  • ई श्रम कार्ड असलेल्या महिला
  • किसान सन्मान निधीअंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
  • मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला
  • गर्भवती, स्तनदा आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शिधापत्रिका मिळालेल्या महिला लाभार्थी
  • आयुष्यमान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी

तुम्हाला प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील / जिल्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा.या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 3 टप्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात.हे 3 अर्ज त्या त्या वेळी विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करावा व भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.

महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇⤵️

तुम्हाला प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

तुम्हाला प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील  पद्धत वापरू शकता.

  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी, खाली दिलेली लिंक ओपन करा.https://web.umang.gov.in/landing/department/pmmvy.html
  • तुम्ही लिंक ओपन केल्यावर तुम्हाला लॉगिन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • लॉगिन ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती पीडीएफ द्वारे अपलोड करायचे आहे.
  • माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड, कॅपच्या दोन्ही टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला apply बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • अप्लाय बटणावर क्लिक करा.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना २०२४ साठी तुमचा ऑनलाइन अर्ज पोर्टलवर सबमिट केला जातो आणि तुम्हाला सर्व फायदे मिळण्याची परवानगी आहे.

अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • एकाच वेळी दोन वेळा अर्ज केल्यास एक अर्ज रद्द केला जाईल.
  • गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला गर्भवती नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • गर्भवती महिलेने दुसऱ्या प्रसूतीसाठी अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.

प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजनेची फायदे

या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे.पहिल्या अपत्यासाठी ५ हजार रुपये दोन टप्प्यात तर ,दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी) ६ हजार रुपये एकावेळी दिले जाणार आहेत . जेणेकरून बाळाला मिळणारे पोषण आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. बाळासाठी चांगली काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ज्या महिलांना मातृत्व रजा मिळत नाही त्यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होईल. या योजनेमुळे मातृ मृत्यू दर कमी होईल. तसेच अल्पवयीन गर्भधारणा कमी करण्यास मदत होईल. व मुलगी झाल्यास सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून दिले जाणार आहेत त्यामुळे मुलींचे शिक्षण आणि  समीक्षकरणाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मुलगा- मुलगी असा भेद कमी होईल. यामुळे मानवी संसाधन विकासात सुधारणा होईल. तसेच देशांमध्ये गरिबी कमी करण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश मातृ आणि बाल मृत्युदर कमी करणे, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!