पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा?
आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT Portal) वरती ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र इ. या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता.
महत्वाचे : मोबाईल वरून अर्ज करताना आपल्या https://mahadbtmahait.gov.in/ पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक/जोडलेला असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.
पॉवर टिलर अनुदान मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करून अर्ज करु शकता.👇👇
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/माहिती.
- आधार कार्ड झेरॉक्स.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- ७/१२, ८अ उतारा.
- मोबाईल नंबर.
- अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.
अटी व शर्ती
- लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे.
हे करू नका?
- निवड होण्याआधी कोणतीही वस्तू/यंत्र खरेदी करू नका.
- निवड झाल्यानंतर पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करू नये.
- वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.
हे करा?
- अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करा.
- पूर्वसंमती मिळाल्या नंतरच औजार/यंत्राची खरेदी करा.
- आपण घेत असलेले यंत्र औजार पूर्वी कोणी घेतले नाही, याची खात्री करा.
- अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.