यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
अधिकृत संकेतस्थळ/वेबसाईट वर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇
- येथे आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला ऑनलाईन सेवा यामध्ये ऑनलाइन रास्त भाव दुकाने हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. Ration Card Online Maharashtra
- आता ऑनलाइन रास्त भाव दुकाने यामध्ये दोन पर्याय दिसतील. त्यामधील AePDS – सर्व जिल्हे हा पर्याय निवडा. आता तुम्ही AePDS यांच्या वेबसाईटच्या पेजवर याल.
- येथे आल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला रिपोर्ट या विभागात RC Details हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ,त्यामध्ये तुम्हाला ज्या महिन्याचे रेशन तपासायचे आहे तो महिना आणि चालू वर्ष निवडा. त्यासोबतच तुमचा बारा अंकी SRC Number म्हणजेच रेशन कार्ड नंबर टाका. आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर या पेजवर तुम्हाला रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांची नावे दिसतील त्यासोबतच तुम्ही ठराविक महिन्यातील रेशन घेतले असेल तर तुम्हाला किती धान्य मिळाले आहे, यासंबंधीची सर्व माहिती दिसेल. Ration Card Online Maharashtra
वरील सर्व माहिती तपासल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे, खाद्य सुरक्षा कायदा अंतर्गत फक्त गहू आणि तांदूळ या धान्याची हमी दिली जाते. इतर धान्य जसे की, डाळ, साखर, खाद्यतेल हे उपलब्धतेच्या आणि वेळोवेळी बदलणाऱ्या सरकारी धोरणानुसार दिले जाते.
अधिकृत माहितीसाठी संपर्क आणि हेल्पलाइन
तुम्हाला मिळणाऱ्या ऑनलाईन धान्याची माहिती आणि प्रत्यक्ष धान्य तफावत आढळून आल्या असतात काल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात किंवा [email protected] या ई-मेलवर किंवा १८००२२४९५० या टोल फ्री नंबर वर तक्रार दाखल करता येते.