Maharashtra weather
Rain Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Forecast sahyadri
सह्याद्री हवामान अंदाज
- : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. २६) राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मालदीव पासून महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तामिळनाडूच्या आणि केरळमध्ये असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील प्रणालीमध्ये मिसळून गेली आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत (ता. २६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
आजपासून (ता.२४) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
तर नाशिक, बीड, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. रविवारी (ता. २६) नंदूरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा, तर धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, गुरूवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान स्थरावला आहे. किमान तापमानातही चढ-उतार सुरूच असून, गुरूवारी (ता. २३) निफाड येथील गहु संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तुमच्या जिल्ह्यासाठी स्पेशल पुढील चार दिवसाचा हवामान अंदाज पहा.
गुरूवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.७ (१५.६), धुळे ३२.० (१३.०), जळगाव ३२.६(१४.०), कोल्हापूर ३०.६ (२०.२), महाबळेश्वर २८.१ (१५.९), नाशिक ३१.२ (१५.०), निफाड ३०.५ (१२.६), सांगली ३१.७ (२०.२), सातारा ३२.१ (१८.०), सोलापूर ३४.८(२१.८), सांताक्रूझ ३५.५ (२१.६), डहाणू ३१.४ (२१.८), रत्नागिरी ३६.५ (२१.६),
छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१६.६), नांदेड ३२.२ (२०.४), परभणी ३२.० (१८.२), अकोला ३४.८ (१७.५), अमरावती ३१.८ (१८.३), बुलढाणा ३१.० (१७.०), ब्रह्मपूरी ३३.३ (१७.८), चंद्रपूर ३१.८(१७.४), गडचिरोली ३१.२ (१६.६), गोंदिया ३०.९ (१५.५), नागपूर ३१.३(१६.६), वर्धा ३१.५(१७.५), वाशीम ३३.२(१६.८), यवतमाळ ३३.७ (१६.०).
जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर.
विजांसह पावसाचा इशारा :
नाशिक, बीड, नांदेड.