सध्या जे मीटर वापरले जात आहेत .ते दर महिन्याच्या मीटर रिडींग वीज बिल कंपनीकडून घेण्यात येते व त्यानुसार आपल्याला वीज बिल पाठवले जाते .पण आता नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केला आहे. याची आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे .ही माहिती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून केव्हाही पाहता येते. वया मीटरच्या माध्यमांनुसार ग्राहक त्याच्या गरजेनुसार व आर्थिक बजेनुसार वीज वापरू शकतो. साधारणपणे 2025 पर्यंत देशांमध्ये सगळे मीटर बदलण्याचा उद्दिष्ट निश्चित केलेले आहे .यासंबंधी बऱ्याच ठिकाणी काम सुरू देखील करण्यात आलेले आहे. घरामध्ये आपण विजेचा वापर किती केला आहे व तुमच्या रिचार्ज मधील किती पैसे शिल्लक आहेत याची सर्व माहिती वीस ग्राहकाला मोबाईल ॲप द्वारे बघता येणार आहे. विजेसाठी भरलेले पैसे जर मध्यरात्री संपले तर रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा बंद केला जाणार नाही .सायंकाळी सहा ते दहा ह्या वेळेत जर पैसे संपले तरी देखील वीजपुरवठा चालूच राहील .तुम्हाला तुमच्या मोबाईल द्वारे विज बिल्ला चे पैसे संपले आहेत हे कळविण्यात येईल व त्यानंतर बारा तासांनी वीज ऑटोमॅटिकली बंद होईल.