पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक मोठी घटना घडली आहे, आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाने हॉटेलमालकाच्या नकारामुळे ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसवला. या घटनेमुळे हॉटेलचे आणि हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पहा व्हिडिओ
संपूर्ण घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. एका ट्रक चालकाने रात्री जेवणासाठी हिंगणगाव येथील हॉटेलवर थांबले. हॉटेल बंद असल्याने मालकाने जेवण देण्यास नकार दिला. मात्र या नकाराचा राग ट्रक चालकाला इतका आला की त्याने रागाच्या भरात ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसवला. त्यात हॉटेलची मोडतोड झाली आणि बाहेर उभ्या असलेल्या वाहनांनाही धडक बसली.
हॉटेलमालक आणि कर्मचारी यावेळी सुरक्षितपणे बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. परंतु हॉटेलच्या परिसरातील अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. ट्रक चालकाला या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे ही गंभीर समस्या आहे ज्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे टाळणे याचे महत्त्व या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.