टोमॅटो शेतीसाठी पीक संरक्षण | टोमॅटो शेती चे कीड व रोग व्यवस्थापन

पीक संरक्षण : 

रोग टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच फळे पोखरणारी अळी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

मर :  हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात. उपटलेल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात.

  नियंत्रण ः रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची प्रतिझाड ५० ते १०० मि.लि. प्रमाणे जिरवण करावी.

करपा :  यात लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.

नियंत्रण ः मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

विषाणूजन्य रोग :  टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व पर्णगुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे विषाणूजन्य रोग आढळतात. त्यांचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी यामुळे होतो. या किडींचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते.

किडीच्या नियंत्रणासाठी: प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. रोग शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून नष्ट करावीत. 

फळे पोखरणारी अळी :  ही अळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते. 

नियंत्रण ः क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. हेलीओथिस न्युक्‍लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एचएनपीव्ही) विषाणूजन्य कीटकनाशक २०० मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.

नागअळी :  या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते.

नियंत्रण ः रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढून टाकावीत. ४ टक्के निंबोळी अर्काच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात.  अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्‍टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
पुढे वाचा
तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, ...
पुढे वाचा
नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी पहा. |Shaktipeeth expressway village list.

नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी पहा. |Shaktipeeth expressway village list.

Shaktipeeth expressway नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प ...
पुढे वाचा
गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव पहा. कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन ...
पुढे वाचा
पशु विमा योजना महाराष्ट्र|animal insurance scheme in Maharashtra.

पशु विमा योजना महाराष्ट्र|animal insurance scheme in Maharashtra.

Animal Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो महाफार्म वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत ...
पुढे वाचा
Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

मतदान कार्डसाठी तयार करण्याची प्रक्रिया Apply New Voter ID Card ...
पुढे वाचा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: 10 लाख रुपये कर्ज आणि 35 टक्के सबसिडी!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: 10 लाख रुपये कर्ज आणि 35 टक्के सबसिडी!

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ...
पुढे वाचा

Leave a Comment