गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.
फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाऊनलोड करू शकता. तशी सुविधा महसूल विभागानं उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाईन फेरफार डाऊनलोड कसा करावा ? ही माहिती पाहण्यापूर्वी फेरफार म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाच आहे. शेताच्या बाबतीत विषय निघाला की, तुम्ही खूप वेळा फेरफार हा शब्द ऐकला असेल. फेरफार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून महसूल विभागाच्या दृष्टीने कोणत्याही कारणास्तव गाव नमुना 7 व 12 यामधील कायदेशीर मान्यतेने करण्यात आलेला बदल म्हणजे फेरफार होय.
फेरफार संकल्पना थोडक्यात समजून घेण्यासाठी एक उदाहरण पहा. समजा एखाद्या व्यक्तीने आपली मालकी हक्काची जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली, तर विकणाऱ्या व्यक्तींचा गाव नमुना 7 मधील जमिनीवरील हक्क रद्द होऊन त्याठिकाणी विकत घेणाऱ्या नवीन व्यक्तींच नाव जोडलं जातं याच बदलास किंवा प्रक्रियेस फेरफार नोंद म्हणतात. फेरफार नोंद झाल्यानंतर एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. तो आपल्याला गाव नमुना सातवर आढळून येतो.
फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇👇👇
जुने फेरफार कागदपत्रांचे फायदे
जुन्या फेरफार कागदपत्रांमुळे अनेक फायदे होतात. यामध्ये हे समाविष्ट आहे:
- मालमत्तेच्या इतिहासाचा पुरावा: जुन्या फेरफार कागदपत्रांमुळे मालमत्तेची खरेदी-विक्री, दान, वारस, कर्ज, उपहार, किंवा इतर कोणत्याही प्रकारे मालकी हक्काची बदली कशी झाली याचा मागोवा घेता येतो. हे मालमत्तेच्या खरेदीदारांना मालमत्तेच्या मालकीच्या अधिकाराबद्दल माहिती देण्यास मदत करू शकते.
- मालमत्तेचे मूल्यांकन: जुन्या फेरफार कागदपत्रांमुळे मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी मदत होऊ शकते. या कागदपत्रांमध्ये मालमत्तेची खरेदी किंमत, कर्जाची रक्कम, किंवा इतर व्यावसायिक माहिती असू शकते जी मालमत्तेच्या मूल्यांकनात मदत करू शकते.
- मालमत्तेच्या विक्रीला मदत: जुन्या फेरफार कागदपत्रांमुळे मालमत्तेच्या विक्रीला मदत होऊ शकते. या कागदपत्रांमध्ये मालमत्तेचे मालकी हक्क आणि मालमत्तेचा इतिहास याबद्दल माहिती असते जी खरेदीदारांना मालमत्तेच्या खरेदीचा निर्णय घेण्यास मदत करू शकते.
शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना शेतीशी निगडित विविध लाभ घरबसल्या व जलदगतीने मिळविता याव्यात यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये ऑनलाईन जुना किंवा नवीन फेरफार डाऊनलोड करणे, डिजिटल सातबारा व आठ अ उतारा डाऊनलोड करणे, जमिनीचा प्रॉपर्टी कार्ड, भू-नकाशा ऑनलाईन डाऊनलोड इत्यादींचा समावेश आहे. याठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जमिनीचा ऑनलाईन Ferfar land record Download कसा करावा ? याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
फेरफार उतारा डाऊनलोड कसा करावा याबाबत जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
तुमच्या शेत जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇
इतर काही योजना: 👇👇
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना
रूफटॉप सोलार योजना
शेळीपालन अनुदान योजना
शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना
फेरफार डाऊनलोडसाठी फी किती ?
ऑनलाईन फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी सामान्यता: शेतकरी किंवा नागरिकांना 15 रु. इतका शुल्क आकारला जातो. त्यासाठी फेरफार डाऊनलोड करण्यापूर्वी फेरफार पोर्टलवरती देण्यात आलेला रिचार्ज पर्याय वापरून वॉलेटमध्ये आपल्या गरजेनुसार निश्चित रक्कम क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून जमा करावी लागते. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ई फेरफार डाऊनलोड करता येतो. वॉलेटमध्ये अधिकतम रक्कम जमा करण्याची मर्यादा 1,000 रु. ठेवण्यात आलेली आहे.