रमाई आवास योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- आता तुमच्या समोर होम पेज उघडला असेल त्यात तुम्हाला तूमची नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती जसेकि तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी भरायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर रमाई आवास योजना फॉर्म उघडेल त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अशाप्रकारे तुम्हाला रमाई आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.
रमाई आवास योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची पद्धत.
Ramai Awas Yojana Offline Registration Process
- या योजनेअंतर्गत अर्जदाराने आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका कार्यालयात किंवा महानगर पलिकात जाऊन या योजनेचा अर्ज घेयाच आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून व लागणारी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सदर करायचा आहे.
योजनेचे नाव | Ramai Awas Yojana |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उद्देश | आर्थिक दृष्ट्या वंचित गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे. |
रमाई आवास योजना फॉर्म PDF | येथे क्लिक करा |
लाभार्थी | अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील गरीब नागरिक |
द्वारे सुरू | महाराष्ट्र शासन |
रमाई आवास योजना GR | येथे क्लिक करा |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
प्रकार | घरकुल योजना |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र |
अधिक योजना | येथे क्लिक करा |
FAQ
रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात
रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण संपूर्ण घराच्या खर्चासाठी 1 लाख चाळीस हजार रुपये मिळतात
रमाई घरकुल योजना कोणासाठी आहे
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना आहे
रमाई घरकुल योजनेसाठी कोण अर्ज करू शकत
रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी हसायला हवा व तो अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील घटक असावा
रमाई आवास योजनेसाठी अर्ज कुठे करायचा
रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता
रमाई आवास योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात
रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याला घराच्या संपूर्ण बांधकामासाठी व त्या बांधकामाच्या मजुरीसाठी एकूण 1 लाख 40 हजार रुपये इतके अनुदान मिळते