व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पशु विमा योजना महाराष्ट्र|animal insurance scheme in Maharashtra.

Animal Insurance

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाफार्म वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्य सरकार पाळीव जनावरांच्या विम्यासाठी लवकरच नवीन योजना आणत आहे.आता पर्यंत शेतकऱ्यांना जनावरांचा विमा काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती.

त्यामुळे बरेच शेतकरी आपल्या जनावरांचा विमा काढत नसत.हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाने शेतकऱ्यांना केवळ तीन रुपयांत आपल्या जनावरांचा विमा काढता यावा असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळा समोर ठेवला आहे.यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाच्या होणाऱ्या मृत्यूमुळे आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही.

पशु खरेदीसाठी सरकारकडून अनुदान मिळत आहे. संपूर्ण माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्यात 2019 मध्ये केल्या गेलेल्या पशू गणनेनुसार एकूण 3.3 कोटी पशुधन आहेत.यामध्ये 1कोटी 39 लाख गायी,56 लाख म्हशी,26 लाख 80 हजार मेंढ्या,1 कोटी 6 लाख शेळ्या आणि 1 लाख 61 हजार वराहांचा समावेश आहे.

पशु विमा योजना

सदर योजना ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मिळून राज्यात पशुविमा नावाने राबविणार आहेत.यामध्ये पशू विम्याची प्रीमियम रक्कम म्हणून केंद्र सरकार 40 टक्के हिस्सा,राज्य सरकार 30 टक्के हिस्सा आणि उर्वरित 30 टक्के हिस्सा लाभार्थ्याला भरावा लागणार आहे.

शेळीपालनासाठी सरकारकडून १० लाख रुपये अनुदान 👇👇👇

सुरुवातीला राज्य सरकार या योजनेमध्ये दीड लाख जनावरांचा विमा काढण्याचे प्रस्तावित आहे.त्यामुळे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच जनावरांचा विमा या योजनेच्या अंतर्गत उतरविता येणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
Animal Insurance

१.या योजनेच्या अंतर्गत एका जनावराचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ तीन रुपये मोजावे लागणार आहेत.
२.एका शेतकऱ्याला फक्त पाच जनावरांचा विमा काढण्याची मर्यादा असेल.
३.सुरुवातीला या योजनेच्या अंतर्गत दीड लाख पशुधनांचा विमा उतरविण्यात येईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

पोल्ट्री फार्म हाऊसवर २५ लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!