व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Mgnrega Job Card कसे बनवायचे| असे करा जॉब कार्ड डाउनलोड|जॉब कार्ड लिस्ट

Mgnrega Job Card: नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आजच्या  लेखांमध्ये आपण मनरेगाच्या जॉब कार्ड(Mgnrega job card) बद्दल जाणून घेणार आहोत. आपण जाणून घेऊया की हे जॉब कार्ड कसे काढायचे, जॉब कार्ड साठी कोणती पात्रता लागेल, ते कसे डाउनलोड करायचे, आणि या जॉब कार्डचा नेमका उपयोग काय आणि तो कसा मिळवायचा.  तर चला मित्रांनो आपण या सर्व बाबींची माहिती सविस्तरपणे बघूया.

 काय आहे जॉब कार्ड:

मनरेगा योजना अंतर्गत गावातील लोकांसाठी  जॉब कार्ड बनवले जाते. जॉब कार्ड मनरेगा अंतर्गत जे कोणी काम करण्यास इच्छुक असतील त्यांच्यासाठी हे कार्ड बनवले जातील. जर तुम्हालाही कामाची संधी हवी असेल तर तुम्हाला येईल हे कार्ड बनवावे लागेल आणि ते कसे बनवतात हे आपण बघूया. 

तुमच्या गावांमधील जॉब कार्ड असणाऱ्या व्यक्तींची लिस्ट पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

जॉब कार्ड कसे बनवायचे(How to make Mgnrega Job Card):

सर्वात आधी जेव्हा नवीन जॉब कार्ड काढायचे आहे तेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतीला भेट द्यावी लागेल म्हणजेच ग्रामपंचायत येथील ऑपरेटर किंवा सरपंच यांची भेट घ्यावी लागेल. गावातील ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून तुम्हाला जॉब कार्ड बनवण्याकरता अर्ज घ्यायचा आहे. हा अर्ज संपूर्ण भरून सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जॉब कार्ड अर्जासोबत  जोडून तो अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर तुमचे जॉब कार्ड 15 ते 20 दिवसांमध्ये तयार होऊन जाईल.  तुम्हाला जॉब कार्ड साठी चा नंबर मिळेल. या नंबरचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये जॉब कार्ड डाउनलोड करू शकतात. चला तर मित्रांनो आता पाहूया जॉब कार्ड बनवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

जॉब कार्ड बनविण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 •  बँक पासबुक
 •  अर्जदाराचा  पासपोर्ट साईज फोटो
 •  जॉब कार्ड फॉर्म

जॉब कार्ड नंबर कसा काढायचा(How to download job card number)?

मित्रांनो, जॉब कार्ड नंबर च्या मदतीनेतुम्ही जॉब कार्ड ची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवरून पाहू शकतात. जॉब कार्ड चा नंबर काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील:

 • जॉब कार्डचा नंबर पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.☝️
 • या पेजवर संपूर्ण माहिती भरावी लागेल म्हणजेच वर्ष, जिल्हा, तालुका, तुमचे गाव त्यानंतर प्रोसिड बटन वर क्लिक करा.
 •  पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर R1 जॉब रजिस्ट्रेशन(R1 job registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर(job card/employment register) यावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल त्यात  तुम्ही तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल. तो तुम्ही सुरक्षितपणे लिहून ठेवा.

 अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचा जॉब कार्ड नंबर फक्त तुमच्या मोबाईलचा वापर करून शोधू किंवा मिळवू शकतात. आता आपण बघूया जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे ते.

जॉब कार्ड डाउनलोड कसे करायचे?

Job card Download:मित्रांनो जर तुम्हाला नोकरीची संधी हवी असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे खूप गरजेचे आहे जर तुमचे जॉब कार्ड हरवले आहे किंवा फाटलेले आहे तर तुम्ही ते कसे डाउनलोड करू शकतात याची माहिती आपण घेऊया.

 • सर्वप्रथम जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वर दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.☝️
 • या पानावर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल  जसे की आर्थिक वर्ष, जिल्हा, तालुका, गावाचे नाव.  नंतर Procced  या बटणावर क्लिक करावे लागेल.
 •  त्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर R1 जॉब रजिस्ट्रेशन(R1 job registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर(job card/employment register) यावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल त्यात  तुम्ही तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल.
 • तुमच्या नावासमोरील जॉब कार्ड नंबर वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे जॉब कार्ड दिसेल. आता तुम्ही तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतात.
 •  पुढे तुम्हाला त्यावर तुमचा पासपोर्ट साईज फोटो  लावून त्यावर सही शिका घ्यायचा आहे.

जॉब कार्ड चे स्टेटस कसे पाहायचे?

 मित्रांनो, जर घर बसल्या तुम्हाला तुमच्या जॉब कार्ड ची स्थिती म्हणजेच स्टेटस बघायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

 • जॉब कार्ड चे स्टेटस किंवा स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या संकेत स्थळावर भेट द्यावी लागेल.☝️
 • या पानावर तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल  जसे की आर्थिक वर्ष, जिल्हा, तालुका, गावाचे नाव.  नंतर Procced  या बटणावर क्लिक करावे लागेल.
 •  त्यानंतर पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर R1 जॉब रजिस्ट्रेशन(R1 job registration) या कॉलम मध्ये जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर(job card/employment register) यावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला एक लिस्ट दिसेल त्यात तुमच्या गावातील जॉब कार्ड बनवलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचे जॉब कार्ड नंबर दिसेल त्यात  तुम्ही तुमचे नाव शोधा. तुमच्या नावासमोर तुमचा जॉब कार्ड नंबर दिसेल.
 • तुमच्या नावासमोरील जॉब कार्ड नंबर वर क्लिक करा. तुम्हाला तुमचे जॉब कार्ड दिसेल. आता तुम्ही तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जॉब कार्ड चे स्टेटस चेक करू शकतात.

महाराष्ट्र मध्ये जॉब कार्ड साठी रजिस्ट्रेशन कसे करतात?

 जॉब कार्ड चे रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही.  जॉब कार्ड रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामपंचायत ऑपरेटर कडून करावे लागेल. ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर रजिस्ट्रेशन करता येत नाही याचा कारण असे की सर्व सामान्य व्यक्तींना ऑनलाइन फॉर्म भरता येणार नाही.ग्रामपंचायतीत जाऊन फॉर्म भरणे सोपे आहे त्यामुळे जॉब कार्ड साठी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन पद्धतीनी नाही.

जॉब कार्ड  कोणकोणते व्यक्ती बनवू शकतात?

मित्रांनो, जॉब कार्ड गावातील कोणताही साधारण व्यक्ती काढू शकतो. जर तुम्ही काम करण्यास इच्छुक असाल तर तुम्हीही जॉब कार्ड बनवू शकतात. 

मनरेगा जॉब कार्ड अधिकृत वेबसाईट कोणती?

मनरेगाची जॉब कार्ड काढण्यासाठी दिलेली वेबसाईट: https://nrega.nic.in/Nregahome/MGNREGA_new/Nrega_home.aspx

जॉब कार्डचा वापर काय?

मनरेगाकडून मिळालेले जॉब कार्ड हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुम्ही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत राज्य किंवा केंद्र सरकारच्या विविध योजना येत असतात त्यामध्ये काम  मिळवू शकतात.

Leave a Comment

error: Content is protected !!