शेतकऱ्यांना मिळणार 6000 रूपये.
लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा १६ वा आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्याच्या २८ तारखेला जमा होण्याची शक्यता आहे.
पी एम किसान योजनेचे 2000 व नमो योजनेचे 4000 रूपये मिळणार.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून या पोटी १९४३ कोटी ४६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे चार हजार रुपयांप्रमाणे ३७९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहेत.
नमो शेतकरी योजनेमधील अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर येथे होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये या तिन्ही हप्त्यांची सहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे.
नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये मिळणार.
महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यशासना अंतर्गत नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या धरतीवर राबवण्यात येते या योजनेचा पहिला हप्ता आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे व नमो शेतकरी दुसरा हप्ता कधी वितरित केला जाणार त्याची प्रतिक्षा शेतकरी करत होते व दुसरा हप्ता वितरित केला जावा याकरिता राज्य शासन अंतर्गत 1792 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.
नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी अर्थातच डिसेंबर ते मार्च या कालावधीचा हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार कोटी एवढा निधी वितरित करण्यास राज्य शासना अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थातच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे.
१ लाख रुपये बिनव्याजी वापरण्यासाठी येथे अर्ज करा. 👇
28 फेब्रुवारी रोजी जमा होणार ₹6000
पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे व याच तारखेला नमो शेतकरी चा दुसरा हप्ता वितरीत करण्यात यावा याबाबतची तयारी चालू करण्यात आली याबाबतची शक्यता होती, त्यातच आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तीसरा हे दोन्ही हप्ते वितरित करण्याची शक्यता आहे अर्थातच शेतकऱ्यांना आता एकूण सहा हजार रुपये मिळणार आहे.
२८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते एका विशेष समारंभात या हप्त्याचे वितरण होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करत तीन हप्ते एकत्र देण्यात येणार असून याची तयारी थेट पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी विभाग आणि राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.