सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान साठी अर्ज कुठे करावा ?
इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
लाभार्थी शेतकऱ्यांनी पूर्वसंमती मिळाल्यानंतर तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्प उभा करून घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य सामग्री विकत घेऊन प्रकल्पाचे कामकाज संपूर्ण करून घ्यायचे आहे. अनुदान मिळवण्यासाठी गांडूळ युनिटची उभारणी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक देयके देऊन त्यांचे स्वतःचे स्वाक्षरी ऑनलाईन अपलोड करायची आहे. त्यानंतर काही कालावधीनंतर अनुदान हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.