व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र साठी अर्ज सुरू |kusum solar scheme Online Registration माहिती

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र ( कुसुम योजना महाराष्ट्र ): नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री कुसुम योजना 202ऑनलाइन रजिस्ट्रेशन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2023जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल, आणि mahaurja solar pump मिळवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे कुसुम योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक दस्तावेज,PMKY 2023 योजनेचे लाभ कोणते, अर्जासाठी फी किती असणार,कुसुम सोलर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2023 साठी अर्ज कसा करायचा, शंका निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. 

सौर कृषी पंप अर्ज भरण्यासाठी खाली क्लिक करा ?👇👇👇

17 मे 2023 कुसुम सोलर पंप योजना अपडेट | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

महाऊर्जामार्फत राज्यातील. महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक बी. योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंप अन् करीता. महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे. पीएम कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी. क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार. 35 व 7.5 एचपी डीसी क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे असणार आहे.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply

नोट: महाऊर्जा पोर्टल वर शेतकरी बांधवांच्या अर्ज करण्याच्या गर्दीमुळे हे पोर्टल बंद पडत आहे. परंतु रात्रीच्या वेळी हे पोर्टल सुरु असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे पोर्टल चालू आहे कि नाही हे चेक करत राहावे आणि आपला फॉर्म भरून घ्यावा.

PM कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र Online Apply | www.mahaurja.com Kusum Registration

कुसुम सोलर योजनेचा जिल्हा नुसार कोटा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे उद्देश –

कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

PM कुसुम सोलर पंप योजना 2022 महाराष्ट्र GR👇👇

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?

  • अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
  • बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?

  • पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
  • शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
  • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा | How to fill up kusum solar pump application form👇👇👇

 

पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ –

      • शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः

      • शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.

      • शेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते. 

      • भूजल अतिरेक तपासणीची क्षमता

      • शेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते. 

      • शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते. 

    कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता 

        • अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.

        • सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.

        • अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.

        • सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.

        • जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.

        • प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

      कुसुम योजनेचे लाभार्थी –

          • शेतकरी

          • सहकारी संस्था

          • शेतकर्‍यांचा गट

          • जल ग्राहक संघटना

          • शेतकरी उत्पादक संस्था

        कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे –

            • आधार कार्ड

            • पासपोर्ट साईझ फोटो

            • रेशन कार्ड

            • नोंदणी प्रत

            • प्राधिकरण पत्र

            • जमीन प्रत

            • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)

            • मोबाइल नंबर

            • बँक खाते विवरण

          कुसुम योजना अर्ज फी –

          या योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५  मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल. 

              • ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी

              • १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी

              • १.५  मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी

              • २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी

            Mahaurja Kusum Solar Pump Component “B”

                • या अभियांनातर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी.

                • सदर अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचेOn-line  अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.

                • यात2.5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 3 HP, 5 एकर क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 5 HP व त्यापेक्षा जास्त  क्षेत्र धारण करणा-या शेतक-यास 7.5 HP DC पंप आस्थापित करण्याचे नियोजित. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja

                • सौर कृषीपंपाची किंमत रु.1.56 लक्ष (३ HP), रु. 2.225 लक्ष (5 HP), रु. 3.435 लक्ष (7.5 HP)

                • पंपाच्या किंमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषीपंपाच्या किंमतीच्या10 % व अनुसूचीत जाती व जमातीच्या लाभार्थ्याकडून 5 % या दराने अंशदान घेणार. ‘Kusum Solar Pump Yojana Maharashtra’

                • या योजनेंतर्गत केंद्र शासनाचे 30 टक्के वित्तीय  सहाय्य व राज्य शासनाचे 60/65 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के अंशदान लागणार.

                • एकूण उद्दिष्टांपैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप हे 34 जिल्ह्यात त्या जिल्हयाच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर तदनंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन.

                • सौर कृषी पंपाव्दारे उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलर लावण्याची सोय.

              कुसुम सौर कृषी पंप योजना नियम व अटी

                  1. कुसुम सौर कृषिपंपाच्या स्थापनेसाठी टिकाऊ जल स्त्रोताची खोली अर्ज नमुना अर्ज ए 1 मध्ये नमूद केल्यानुसारच आहे.

                  1. चुकीची पाणी पातळी नमूद केलेमुळे पंप चालत नसेल तर, त्यास महाऊर्जा कार्यालय | पुरवठाधारक जबाबदार राहणार नाही. याची मला जाणीव आहे.

                  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी सौर पंपाच्या किंमतीचा लाभार्थी हिस्सा10 टक्के (अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 टक्के) भरणेस मी तयार आहे. ‘Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja’

                  1. सौर पंपाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे याची मला जाणीव करुन दिलेली असून अशी किंमतीचा वाढीव हिस्स्याची रक्कम भरण्यास मी तयार आहे.

                  1. सौरपंपाच्या दररोजची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मी जबाबदार आहे. मी ज्या ठिकाणी सोलर पंपाची मागणी केली आहे तेथे कृषी पंपासाठी मला वीज जोडणी मिळाली नाही. मिळालेल्या सौर पंपाचे रक्षण करणे हि माझी जबाबदारी आहे ह्याची मला जाणीव आहे.

                  1. मी सौर पंप बसविण्याकरिता माझ्या शेतजमिनीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यास बांधिल आहे. Mahaurja Kusum Solar pump

                  1. तसेच सौर तपासणीसाठी मी अधिकारी, वेळोवेळी दुरुस्ती कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे सहकार्य करेन. त्यात अडथळा आणणार नाही किंवा अडथळा आणू देणार नाही.

                  1. या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या शेततळे / विंधन विहीर (बोअरवेल)/ विहीर वर व ज्या सव्र्हे क्र / गट क्रमांक) क्रमांकामध्ये सौर पंप आस्थापित केला आहे, त्या ठिकाणीच कायमस्वरुपी ठेवणार असल्याची हमी देत आहे. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply, mahaurja

                  1. त्याची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी मला महाऊर्जा कडून लेखी परवानगी (नाहरकत प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक आहे आणि मी आज याची हमी देत आहे.

                हेल्पलाइन नंबर –

                या लेखात आम्ही आपल्याला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती दिली आहे. जर आपणास अजुन हि या योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकताआणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. त्यासाठी सदर योजनेची ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या.

                पंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.

                    • मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्क राहा.

                    • त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.

                    • म्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.

                  Leave a Comment

                  error: Content is protected !!