पाईपलाईन योजनेसाठी अर्ज कोठे करावा.
शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे करायचा आहे. पाईपलाइन योजना(pipeline yojana maharashtra)अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना एसएमएस प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
युट्युब व्हिडिओ.👇👇
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – Pipeline Yojana maharashtra onlone Process
शेतकरी मित्रांनो पाईपलाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील प्रकारे प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून खालील दिलेल्या स्टेप प्रमाणे अर्ज करावा.
महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
- सर्वप्रथम गुगल वर जाऊन महाडीबीटी फार्मर असे टाईप करून सर्च करा.
- आता आपल्यासमोर महाडीबीटी शेतकरी पोर्टलची एक अधिकृत वेबसाईट आलेली असेल त्या वेबसाईटला ओपन करा.
- या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- तुम्ही तुमची वैयक्तिक बेसिक माहिती टाकून तसेच एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करून घ्या.
- आता तुम्ही या वेबसाईटवर लॉगिन करा आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून सिंचन साधने व सुविधा ही बाब त्या ठिकाणी निवडा.
- आता वरील पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पाईप संच किंवा पाईप लाईन असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा अर्ज ओपन झालेला आहे, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
अशाप्रकारे आपण पाईपलाईन योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतो.
पाईपलाईन अनुदान योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल, ही माहिती सर्व शेतकऱ्यांना शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा