Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान.

यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

  1. अर्जदार हा शेतकरी असावा.
  2. 8अ व सातबारा असावा ज्यावर कमीत कमी एक एकराची नोंद असावी.
  3. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर जमीन असावी.
  4. आधार कार्ड असावे. ते महाडीबीटी पोर्टल वरील लिंक असावे. जेणेकरून ते आपण महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करू शकतो.
  5. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करावी.
  6. अर्जदार हा अनुसूचित जाती, जमाती चा असेल तर त्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  7. अशा प्रकारच्या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर दहा वर्षेपर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  8. ज्या डीलर कडून पावर टिलर खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून कोटेशन घ्यावेत. कोटेशन बरोबरच एक तपासणी अहवाल घ्यावा जास्त केस रिपोर्ट असे सुद्धा म्हणतात जो ऑनलाइन अपलोड करावा लागणार आहे.

पॉवर टिलर योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करा 👇👇👇

Power Tiller Subsidy in Maharashtra

शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि  हीच शेतकऱ्यांची ओळख, शेतीच्या कामासाठी/मशागतीसाठी औजारे हा महत्वाचा घटक. यामध्ये शेतीच्या कामासाठी  विवध औजारांचा समावेश होतो. ट्रँक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, नांगर, रोटाव्हेटर, वखर, सारा यंत्र इ. अशा विविध औजारांचा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग होतो.

पॉवर टिलर प्रामुख्याने उस चाळणी/बांधणे यासाठी उपयोग होतो. बरेच शेतकरी आता शेतात ऊस पिक घेतात. आणि यासाठी चाळणी/बांधणी बैलाच्या सहाय्याने/पॉवर टिलर च्या सहाय्याने करतात.

पॉवर टिलर ट्रँक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. परंतु पॉवर टिलर यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी जास्त खर्च येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवित असते. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व औजारे यासाठी अनुदान दिले जाते.

पॉवर टिलर साठी अर्ज कसा करावा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

Power tiller subsidy : पॉवर टिलर अनुदान

  • क्षमता ८ बी एचपी पेक्षा कमी असेल : 
    • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी : ६५,०००/- रु.
    • इतर लाभार्थीसाठी : ५०,०००/- रु.
  • क्षमता ८ बी एचपी व त्यापेक्षा जास्त असेल तर :
    • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी : ८५,०००/- रु.
    • इतर लाभार्थीसाठी : ७०,०००/- रु.

पोर्टल वरील माहिती नुसार.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/माहिती.

  • आधार कार्ड झेरॉक्स.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • ७/१२, ८अ उतारा.
  • मोबाईल नंबर.
  • अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.

अटी व शर्ती

  • लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे.

हे करू नका?

  • निवड होण्याआधी कोणतीही वस्तू/यंत्र खरेदी करू नका.
  • निवड झाल्यानंतर पूर्व संमती मिळाल्याशिवाय  खरेदी करू नये.
  • वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.

हे करा?

  • अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करा.
  • पूर्वसंमती मिळाल्या नंतरच औजार/यंत्राची खरेदी करा.
  • आपण घेत असलेले यंत्र औजार पूर्वी कोणी घेतले नाही, याची खात्री करा.
  • अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.

स्वतःची दूध डेयरी उघडण्यासाठी आता 13 लाखांचे कर्ज ! | कर्जावरही 4.50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा करायचा ?

स्वतःची दूध डेयरी उघडण्यासाठी आता 13 लाखांचे कर्ज ! | कर्जावरही 4.50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा करायचा ?

कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेली संकटे कमी करण्यासाठी आणि त्यांना ...
पुढे वाचा
रेशनकार्ड संपूर्ण माहिती|रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. |Download ration card

रेशनकार्ड संपूर्ण माहिती|रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. |Download ration card

Ration Card : आता राहण्याचे ठिकाण जाणून घेण्यासाठी आधारकार्डचा अधिकृत ...
पुढे वाचा
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
पुढे वाचा
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली ...
पुढे वाचा
वन कार्ड क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा | apply one card credit card.

वन कार्ड क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा | apply one card credit card.

वन कार्ड काय आहे? वन कार्ड हे एक क्रेडिट कार्ड ...
पुढे वाचा
पाईपलाईन अनुदान योजना| अर्ज करा.

पाईपलाईन अनुदान योजना| अर्ज करा.

पाईपलाईन योजनेसाठी अर्ज कोठे करावा. शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना ...
पुढे वाचा
Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

PVC आधार कार्ड कसे बनवायचे? यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर ...
पुढे वाचा

Leave a Comment