रमाई आवास योजना 2025 अर्ज, घरकुल यादी: पहा सविस्तर माहिती! | Ramai awas Yojana 2025

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या महाफार्म वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Ramai Awas Yojana रमाई आवास योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्याला माहीतच आहे भारत सरकार व राज्य सरकार नागरिकांच्या हिताच्या व कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना रबिवित असतात. अशीच एक योजना देशातील गरीब आणि वंचित नागरिकांसाठी शासनाने आणलेली आहे ती म्हणजे Ramai Awas Yojana रमाई आवास योजना, ही योजना एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना आहे. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात नागरिक दारिद्य्र रेषेखालील जीवन यापण करतात हे नागरिक साधारणतः कमी उत्पन्न गटातील असतात, त्या करिता त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते. आणि त्याच कारणाने त्यांचे कमी उत्पन्न असल्याने त्यांच्या कडे स्वतःचा निवाऱ्याची व्यवस्था सुधा नसते. तसेच त्यांचे उत्पन्न कमी असल्या कारणाने ते नागरिक स्वतःची जागा सुद्धा घेऊ शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत या नागरिकांकडे कच्चे घर किंवा झोपडी अशा प्रकारची निवाऱ्याची व्यवस्था असते.

असे जीवन जगणारे नागरिक ग्रामीण तसेच शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यांच्या कडे राहायला स्वतःचे पक्के घर नसते. कच्च्या घरांमध्ये त्यांना पावसाचे व आगीचे सुद्धा भेव असते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने गरीब वंचित आणि बेघर नागरिकांसाठी Ramai Awas Yojana रमाई आवास योजना ही सुरू केली आहे.

रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कागदपत्रे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

Ramai Awas Yojana रमाई आवास योजना 2025

आपण पाहतच आहेत राज्यांमध्ये वाढत्या जागेच्या किमतींमध्ये आणि महागाई मध्ये स्वतःचे मालकीचे घर घेणे शक्य होत नाही, तसेच या नागरिकांचे उत्पन्न कमी असल्या कारणाने त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण असते. या अमधील बहुतांश नागरिक ग्रामीण भागात राहतात तर त्यांना राहण्यासाठी कच्चे घर किंवा झोपडी बांधून राहावे लागते. हे सर्व नागरिक आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडतात या दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असणाऱ्या परंतु इंदिरा आवास योजनेच्या मुळ प्रतीक्षा यादीत ज्यांचे नावे नाहीत आणि जे नागरिक बेघर आहेत अशा अनुसूचित जाती आणि नवबौध्द पात्र लाभार्थी नागरिकांना ज्यांच्या जवळ ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी स्वतःची जागा आहे अशा अनुसूचित जाती आणि नवबौध्द नागरिकांना महाराष्ट्र सरकार घर बांधण्यासाठी रमाई आवास योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून देत आहे.

सामान्य विभागा घरकुल बांधकाम1,32,000/- रुपये
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम1,42,000/- रुपये
शहरी विभागासाठी घरकुल बांधकाम2.5/- लाख रुपये
शौचालय बांधण्यासाठी12,000/- रुपये

Ramai Awas Yojana Features योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रधाण्व्य करण्यात येते.
  • रमाई आवास योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
  • ज्या व्यक्तीला रमाई आवास योजनेचा लाभ घेता आहे ते घर बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर क्या साहाय्याने ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांची घरे कच्ची आहेत अशा नागरिकांना पक्के घरे बंधण्यासतही आर्थिक सहाय्य केले जाते.
  • सर्व साधारण क्षेत्रासाठी 1,32,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • शहरी भागातील घर बांधकाम साठी 2,50,000/- रुपये अनुदान दिले जाते.
  • या योजनेकरीता नारेगा अंतर्गत लाभार्थ्यास 90 दिवसाचा रोजगार उपलब्ध केले जाते त्यासाठी लाभार्थ्यास 18,000/- रुपये दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवरगातली जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील नाहीत व त्यांचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक आहे व त्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पर्यंत आहे, आहे अपंग लाभार्थी योजनेच्या इतर अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो.
  • राज्यातील काही बेघर नागरिकांकडे स्वतःचा मालकीची जागा नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेणे अशक्य होते. या करिता शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी 50,000/- रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

Ramai Awas Yojana Purpose योजनेचा उद्देश

  • राज्यातील ज्या नागरिकांना राहायला स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना रमाई आवास योजनेंतर्गत घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी किंवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

रमाई आवास योजना लाभार्थी

Ramai Awas Yojana Beneficiary

  • पडीक झोपडीत राहणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील व्यक्तीचं लाभ घेऊ शकतात.
  • महाराष्ट्रात राहणारी आर्थिक दृष्ट्या गरीब व कमजोर ज्यांच्या जवळ राहायला स्वतःचे घर नाही अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • जे नागरिक गरीब असून त्यांच्या जवळ स्वतःचे पक्के घर बांधायला पैसे नाहीत अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येते.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कार्यपद्धत

  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शक पने केली जाते.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द घटकातील ज्यांचे स्वतःचे घर नाही अशा नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना ग्राम सभा, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून यांच्या मार्फत मंजुरी देण्यात येते.
  • शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका यांच्या हस्ते मंजुरी देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडी मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांना 3 टक्के घरकुल देणे बंधनकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत जमा झालेल्या अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येते.

Ramai Awas Yojana Benefits या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत वंचित आणि गरीब कुटुंबाना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळेल.
  • BPL कार्ड धारक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतील.
  • शहरी भागात घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते
  • सर्वसाधारण भागातील क्षेत्रासाठी घरबांधणीसाठी 1.3 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी 1.42 लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांची तरतूद केली गेली आहे.

Ramai Awas Yojana Terms And Conditions योजनेच्या अटी

  • या योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्तीचा कुटुंबातील जर कोणी व्यक्ती सरकारी सेवेसाठी असेल तर त्या अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराने या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे गरजेचे आहे. त्याकरिता रहिवाशी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील मोडणारा असावा, त्यासाठी जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • ग्रामीण भागात राहत असलेल्या 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी नगर परिषद भागात राहत आसल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार असणे आवश्यक आहे.
  • जर लाभार्थी महानगर पालिका क्षेत्रात, मुंबई सारख्या क्षेत्रात राहत असल्यास 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्क्या स्वरूपाचे घर नसावे.

रमाई आवास योजना अनुदान वितरण पद्धती

पहिला हप्ता

  • घरकुलाचे 50 टक्के अनुदान घराचे बांधकाम सुरू करताना लाभार्थ्यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

दुसरा हप्ता

  • 50 टक्के निधीचा वापर केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

तिसरा हप्ता

  • घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर घराचा ताबा घेताना आणि सक्षम अधिकाऱ्यांनी घराचे काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्या नंतर उर्वरित 10 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

रमाई आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कागदपत्रे पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Ramai Awas Yojana Documents लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • BPL प्रमाणपत्र
  • लाभार्थी ज्या जातीत मोडत असल्यास त्या जातीचे प्रमाणपत्र
  • असेसमेंट पावती.
  • घर टॅक्स पावती.
  • लाभार्थ्यांचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • घर बांधायचे जागेत हिस्सेदारी असल्यास त्यांचे संमती पत्र
  • जन्माचा दाखला.
  • लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
  • पूर ग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • पभार्थी पीडित असल्यास त्याचा दाखला.
  • लाभार्थी कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षाचे रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र.
  • लाभार्थ्यांचे रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक आहे.
  • 100/- रुपये च्या स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रतिज्ञापत्र
  • लाभार्थ्यांचे बँके मध्ये जॉइंट अकाउंट असणे अनिवार्य आहे ( नवरा बायको )

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

शेतकरी बांधवांनो! आज महाराष्ट्रात घेतले जाणारे कलिंगड पीक जाणून घेऊया ...
पुढे वाचा
लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक ...
पुढे वाचा
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

तर माझ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा ...
पुढे वाचा
रेशनकार्ड संपूर्ण माहिती|रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. |Download ration card

रेशनकार्ड संपूर्ण माहिती|रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. |Download ration card

Ration Card : आता राहण्याचे ठिकाण जाणून घेण्यासाठी आधारकार्डचा अधिकृत ...
पुढे वाचा
Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची ...
पुढे वाचा
स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले ...
पुढे वाचा

Leave a Comment