योजनेच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा?
पॉलीहाऊस, ग्रीन शेडनेट हाऊस यांच्या बांधणीसाठी तुम्हाला अनुदान अर्जासह, माती पाणी चाचणी अहवाल, अल्प मार्जिनल प्रमाणपत्र, कंत्राटी फर्मचे कोटेशन यासह ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्या आधारावर कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याने शेडनेटची रक्कम जिल्हा कार्यालयात जमा करावी. रक्कम जिल्हा कार्यालयात जमा केल्यानंतर संबंधित फर्मला जिल्हा कार्यालयाकडून कळविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने माहिती दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत मॅन्युफॅक्चरिंग फर्मने वर्क ऑर्डर दिल्यावर, जिल्ह्याच्या कामाच्या नियमांनुसार कामाच्या किंमतीत हमी दिली जाईल.
अनुदान किती मिळतं?
ग्रीन शेडनेट हाऊस उभारण्यासाठी लागणारी रक्कम शेतकरी संबंधित जिल्हा फलोत्पादन विकास सोसायटीकडे जमा करेल. शेडनेटचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याने संबंधित कार्यालयाला माहिती दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत भौतिक पडताळणी केली जाईल.
हरित शेडनेट हाऊसवर शेतकऱ्याचे नाव, स्थापन केलेलं वर्ष, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदानित लिहावं लागणार आहे. शेतकऱ्यांना युनिट खर्चाच्या 50% अनुदान देण्यात येणार आहे. पण अल्प, अत्यल्प, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकर्यांना 20% अनुदान राज्य योजना प्रमुखाकडून देण्यात येत असतं. म्हणजेच, या शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळू शकणार आहे. अनुदानाचा हा आकडा राज्यनिहाय वेगळा असू शकतो.
पॉलिहाऊस अनुदान
4 हजार स्क्वेअर मीटरचे पॉलीहाऊस बांधण्यासाठी 34 लाख रुपये खर्च येतो, म्हणजेच प्रत्येक प्रति चौरस मीटरसाठी 844 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळाल्यानंतर शासनाकडून 23 लाख रुपये रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
शेडनेट हाऊस अनुदान
4 हजार स्क्वेअर मीटरचे शेडनेट हाऊसच्या बांधणीसाठी सुमारे 28 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 19 लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल.
अर्ज कुठे करावा.
या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt Farmer portal वर ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
शेडनेट व पॉलिहाऊस अनुदान अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇
शेडनेट योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम mahadbt पोर्टलवर तुमची नाव नोंदणी करून घ्या. नोंदणी झाल्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रीएट केल्यानंतर mahadbt पोर्टल वर लॉगीन करा.
आता इथे लॉगीन झाल्यावर कृषि विभाग असे नाव दिसेल त्या समोर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. ज्या योजनेचे अनुदान पाहिजे त्या योजनेसमोर क्लिक करा. आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. त्यानंतर माहिती जतन (save) करा या पर्यायावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी आपल्या गावाजवळच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
शेतकऱ्याचे आधार कार्ड ७/१२ उतारा, ८अ उतारा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, जातीचा दाखला ( आरक्षण असल्यास) शेडनेट कोटेशन मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावा (मोबाईल OTP साठी सोबत असावा).
मित्रांनो वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळामध्ये नक्के share करा. शेती विषयक updates मिळवण्यासाठी आमच्या whats app ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद..!