व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

टोमॅटो शेती च्या जाती व रोपे तयार करणे.

जाती : 

भाग्यश्री ः या जातीच्या फळांत लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते.

धनश्री ः फळे मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

राजश्री ः फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरीत वाणाचे उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.

फुले राजा ः फळे नारंगी, लाल रंगाची असतात. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रतिहेक्‍टर मिळते.

रोपे तयार करणे :

  महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड शस्वीरीत्या केली जाते.  अपेक्षित उत्पादनासाठी योग्य रोपांची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आवश्‍यक असते.  एक हेक्‍टर क्षेत्रासाठी ३ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी.  टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.  रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी.

गादीवाफ्यावर रोपे करने

३ मी. x १ मी. x  १५ सें.मी. आकाराचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९ः१९ः१९ किंवा १०० ग्रॅम १५ः१५ः१५ चांगले एकसारखे मिसळावे.  बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोगनियंत्रणात राहतात.  त्यानंतर हाताने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत.  साधारणपणे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे.  जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.  रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५ ते ३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादी वाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेन्डाझीम २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.  रोपे ४ ते ६ पानावर आल्यावर म्हणजेच २५ ते ३० दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.

रोपवाटिकेची ट्रे पद्धत :  

राेपवाटिकेचा कालावधी हंगाम बी पेरणीचा कालावधी पुनर्लागवडीचा कालावधी  खरीप मे ते जून जून ते जुलै  रब्बी सप्टेंबर ते ऑक्‍टोबर ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर  उन्हाळी जानेवारी ते फेब्रुवारी फेब्रुवारी ते मार्च  ट्रे पद्धतीने रोपे तयार करावयाची असल्यास ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमणे बी पेरावे. या पद्धतीत बियाणे वाया जात नाहीत. तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोईस्कर आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!