व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 |MJPJAY in marathi

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 Maharashtra In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करोना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Online Application, Disease List, Hosptal List, Registration | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी PDF

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय / निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो, याच बरोबर यावेळी संपूर्ण जगामध्ये कोविड -19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे तसाच राज्यामध्ये सुद्धा करोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला होता, त्यामुळे शासनाने या योजनेच्या अंतर्गत, योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर सर्वच नागरिकांना या करोना महामारीच्या संकटामध्ये नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये आणि जनतेला आरोग्य विषयक हमी  देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कालावधी शासनाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, वाचक मित्रहो आपण या लेखात महाराष्ट्र सरकारच्या या आरोग्य योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता, ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन अर्ज, तसेच या योजनेंतर्गत येणाऱ्या आजारांची यादी, अंगीकृत रुग्णालयाची यादी हि संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दवाखान्यांची (हॉस्पिटल) यादी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे, सुरुवातीला महाराष्ट्र राज्यात सरकारने जीवनदायी योजना सुरु केली होती ज्यामध्ये फक्त गंभीर आजारांचा खर्च समाविष्ट होता, या योजनेमध्ये त्रुटी असल्यामुळे सरकारने नंतर या योजनेमध्ये संपूर्ण बदल करून आंध्रप्रदेश प्रदेशाच्या यशस्वी ‘आरोग्यश्री’ आरोग्य योजनेच्या धर्तीवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2 जुलै 2012 ला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात सुरु करण्यात आली होती. या योजनेमध्ये सुधारणा करून 971 प्रकारच्या शस्त्रक्रिया व थेरपी आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला, या योजनेमध्ये मुंबई, ठाणे, धुळे, नांदेड, अमरावती, गडचिरोली, सोलापूर, रायगड या आठ जिल्ह्यांमधील 52.37 लाख कुटुंबे समाविष्ट करण्यात आली होती.

या योजने अंतर्गत जुलै 2012 ते ऑक्टोबर 2013 या कालावधीत एक लाखहून अधिक प्रक्रिया पार पाडण्यात आल्या होत्या, या योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र शासनाने हि योजना नोव्हेंबर राज्यातील संपूर्ण 35 जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर हि राजीव गांधी जीवनदायी योजना दिनांक 1 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास शासनाकडून  मान्यता देण्यात आली, तसेच महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी एक कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे, या सेंटरच्या 32 लाईन्स व्दारे नागरिकांसाठी चोवीस तास कॉल करण्याची सुविधा उपलब्ध राहील, नागरिक या सुविधेचा उपयोग तीन प्रकारे करू शकतील आजारी रुग्णालयात उपचार घेताना व रुग्णलयातून घरी परतल्यानंतर आणि आजाराबद्दल नंतर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांच्या उपचार प्रक्रियेमधील आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब दोन लाख इतकी ठेवण्यात आली आहे, तसेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा वाढूऊन तीन लाख दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब करण्यात आली आहे, या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश राहील, तसेच या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचा उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: नवीन अपडेट्स (28 जून 2023)

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023: राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जाहीर केलेल्या घोषणांमध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आहे, जी सर्वसामान्यांसाठी सर्वात ‘निरोगी’ योजना आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

आता या योजनेतून पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य खासगी रुग्णालयांमध्ये लाखोंची बिले भरण्याऐवजी या योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार घेता येणार आहेत. जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा.👇👇

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 वैशिष्ट [Features]

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि जुन्या योजनेच्या धर्तीवर नवीन उपचारांचा समावेश करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरु करण्यात आली. राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी करीत असताना, या योजनेमध्ये काही नवीन वैद्यकीय प्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी विविध स्तरांवरून मागणी करण्यात येत होती, त्याच बरोबर प्रती कुटुंब 1.5 लाख हि मर्यादा वाढविण्यासाठी आणि तसेच या योजनेमध्ये रुग्णालयाची संख्या वाढविण्याची मागणी येत होती. त्याचप्रमाणे विविध स्तरावरील झालेल्या चर्चेच्या अनुसार ज्या वैद्यकीय प्रोसिजर्सची मागणी कमी आहे त्या प्रोसिजर्स वगळण्यात येऊन ज्या वैद्यकीय प्रोसिजर्सची मागणी आणि आवश्यकता अधिक आहे.

अशा प्रोसिजर्स आणि रुग्णालये समाविष्ट करण्याची बाब शासनाची विचाराधीन होत, तसेच हि योजना आणखी लोक उपयोगी व्हावी, जेणेकरून रुग्णांना त्यांचा जवळच्या रुग्णालयात उपचार घेणे सोयीचे होईल, तसेच नोंदणीकृत पत्रकारांचा समावेश करणे त्याचप्रमाणे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे तसेच शस्त्रक्रियेसाठी येणारा जास्तीचा खर्च भागविण्यासाठी सोसायटी कडे अतिरिक्त निधीची व्यवस्था करणे, अशा विविध प्रकारच्या सुधारणा या योजनेत करून राज्यात दारिद्र्यरेषेखालील व दारिद्य्र रेषेवरील कुटुंबाना गंभीर आणि खर्चिक आजारांवरील मोफत उपचार देण्यासाठी नवीन स्वरुपात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2016 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेंतर्गत विमा संरक्षण आणि विमा हप्ता :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्शुरंस कंपनीस अदा करण्यात येतो, सदर विमाहप्ता चार त्रैमासिक हप्त्यांमध्ये अदा करण्यात येतो. या योजनेंतर्गत लाभार्थी परिवारास दरवर्षी 2 लाख रुपये प्रमाणे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच या योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा 3 लाख रुपये प्रतीवर्ष इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच लाभार्थी परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तिंना या योजनेचा लाभ घेता येतो. या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असेल आणि तसेच योजनेंतर्गत रुग्णाला उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचाही समावाश असेल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय प्रोसिजर्स :- या योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रोसिजर्स पैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजार्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या मध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार (Hip & Knee Replacement), सिकलसेल, अनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, इत्यादी साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजार्सचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला असून या मध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकरिता राखीव ठेवण्यात येत आहे.

परंतु डोंगराळ भागात / आदिवासी भागात तसेच वर नमूद केलेल्या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालयासाठी राखीव असलेले उपचार प्रक्रियांसाठी पुरेशी पर्यायी आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केल्यानंतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच सदर उपचारपद्धतीच्या वापराचा वेळेवेळी आढावा घेऊन त्यामध्ये नवीन प्रोसिजर्स वाढविणे किंवा कमी करणे याचा अधिकार नियामक परिषदेस असतील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नि:शुल्क उपचार सेवा :- या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्याची प्रोसेस संपूर्ण संगणीकृत असून पात्र लाभार्थ्यांना वैध रेशनकार्ड पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा, आणि केशरी रेशनकार्ड व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालायांमधून उपचार अनुज्ञेय आहेत, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त चवदा जिल्ह्यातील पांढरे रेशनकार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडील पांढरे रेशनकार्ड व 7/12 उतारा आणि फोटो या ओळखपत्रांच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. या योजनेंतर्गत वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार निदान, आवश्यक औषधोउपचार, सुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेस परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर दहा दिवसापर्यंतच्या सेवा पॅकेज मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट हॉस्पिटल्स :- या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय किंवा निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे, पात्र लाभार्थी रुग्ण त्यांच्या सोयीनुसार राज्यातील त्यांच्या जवळ असणाऱ्या अंगीकृत रुग्णालयात जाऊन उपचार मिळऊ शकतात. तसेच योजनेमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी पूर्वी निश्चित केलेली कार्यपद्धती व मानके कायम राहतील तसेच योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित राहणार नाही. डोंगराळ / आदिवासी आणि सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील सर्व रुग्णालयांना योजनेंतर्गत अंगीकृत होण्यासाठी निकष शिथिल करून कमीत कमी 20 खाटांची मर्यादा राहील. या रुग्णालयांचा योजनेमध्ये समावेश करण्याबाबतची कार्यवाही सोसायटी व विमा कंपनी करेल. तसेच या योजनेंतर्गत काही विशिष्ट परिस्थिती मध्ये आणि आवश्यकते नुसार सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षासाठी योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल. सरकारी आणि खाजगी रुग्णालयाची कमाल संख्या 1000 असेल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट नाही :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत हर्निया, योनी किंवा पोटातील हिस्टेरेकटॉमी, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, डीसेकटॉमी, इत्यादी या सह नियोजित 131 प्रक्रिया वगळता सर्व स्वीकार्य आरोग्य सेवा खर्च समाविष्ट आहेत. या केवळ सरकारी पेनेलमधील रुग्णालये किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यलयात केल्या जातील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य मित्राची भूमिका :- या योजनेमध्ये समविष्ट असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोदणी, रुग्णांना उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशा प्रत्येक अंगीकृत रुग्णालया मध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत घेण्यात येणारे आरोग्य शिबीर :-योजनेंतर्गत अंगीकृत रूग्णालयाव्दारे तालुका मुख्यालय, प्रमुख ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये मोफत शिबीरे आयोजित केली जातील. जिल्हा सनियंत्रण समिती किंवा जिल्हा समन्वयक यांनी सुचविलेल्या ठिकाणी प्रत्येक अंगीकृत हॉस्पिटलव्दारे महिन्याला किमान एक मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले जाते.

(MJPJAY) Highlights 

योजनामहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
योजना सुरवात1 एप्रिल 2017
व्दारे सुरुमहाराष्ट्र सरकार
ऑफिशियल वेबसाईटjeevandayee.gov.in
उद्देश्यराज्याच्या गरीब नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे
राज्यमहाराष्ट्र
विभागमहाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी
हेल्पलाईन नंबर1800 233 2200

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समाविष्ट उपचार

या योजनेंतर्गत 31 विशेष सेवांतर्गत 1100 उपचार व शस्त्रक्रिया आणि तसेच 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत खालीलप्रमाणे विशेष सेवांच्या अंतर्गत उपचार आणि सेवा देण्यात येत आहे.

  • सर्व साधारण शस्त्रक्रिया
  • नाक कान घसा शस्त्रक्रिया
  • नेत्ररोग शस्त्रक्रिया
  • स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
  • अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  • पोट व जठार शस्त्रक्रिया
  • कार्डीओव्हस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया
  • मज्जातंतूविकृती शास्त्र
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • वैद्यकीय कर्करोग उपचार
  • रेडीओथेरेपी कर्करोग
  • त्वच्याप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • जळीत
  • पॉलिट्रामा
  • प्रोस्थेसिस
  • जोखिमी देखभाल
  • जनरल मेडिसिन
  • संसर्गजन्य रोग
  • बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • हृदयरोग
  • नेफ्रोलोजी
  • न्युरोलोजी
  • पल्मोनोलोजी
  • चर्मरोग चिकित्सा
  • रोमेटोलोजी
  • इंडोक्रायनोलोजी
  • मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
  • इंटरवेन्शनल रेडिओलोजी 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करोना उपचार (MJPJAY) कोविड -19

करोना विषाणूचा आजार सर्व जगभर पसरला होता आणि या करोना विषाणूच्या आजाराची लागण पूर्ण देशभर सुद्धा झाली होती, आणि करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यात वाढत असलेली करोना बाधित रुग्णांची संख्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरीकांना सर्व नेटवर्क हॉस्पिटल मार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयाप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये काही ठिकाणी कोविड -19 रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आले होते.

कोविड -19 उपचारासाठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालायांकडून करोना संशयित रुग्णांवर उपचार करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या आवश्यक बाबींवर शासनाने निर्धारित केल्या दरानुसार निधी देण्यात येत होता. करोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी या योजनेचे नवीन निकष तयार करण्यात आले आहे, त्यानुसार आता या योजनेमध्ये वीस पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे या अंतर्गत करोना रुगानांच्या उपचारासाठी वीस ते 85 हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आले आहे. यानंतर कोविड उपचारा दरम्यान जगामध्ये करोनाचे निरनिराळे वेरीयंट निर्माण झाले आणि भारतात सुद्धा हे नवीन करोना वेरीयंट गंभीर आजार निर्माण करत होते, त्यापैकी कोविड -19 चा नवीन वेरीयंट ओमिक्रॉन विषाणूच्या आजाराची गंभीरता विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला, या अगोदर या योजनेची मुदत ऑक्टोबर 2021 मध्ये वाढविण्यात आली होती.

देशामध्ये या करोनाच्या महामारी मुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तसेच या महामारीमुळे लागलेल्या लॉकडाऊन मध्ये नागरिकांचे सुद्धा आर्थिक नुकसान झाले त्यामुळे करोनाच्या उपचारांचा आणखी बोजा नागरिकांवर पडूनये यासाठी समाजातील विविध कार्यकर्त्यांनी या योजनेची मुदत वाढविण्याची विनंती शासनाला केली होती. अशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या करोना महामारीच्या संकटकाळात सामान्य गरीब नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आणि उपयोगी ठरली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल आणि सामान्य गरीब तसेच कमी उत्पन्न असलेल्या नागरीकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा व उपचार देण्याचा मुख्य उद्देशाने MJPJAY हि योजना महाराष्ट्र शासनाने नागरीकांसाठी सुरु केली, या योजनेव्दारे दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील कुटुंबाना अत्यंत महागड्या आणि खर्चिक वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळावा असा या योजनेचा उद्देश आहे, शासनाने यासाठी सरकारी आणि निम सरकारी रुग्णालयांचे एक नेटवर्क तयार केले आहे तसेच या योजनेमध्ये राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि गरीब नागरिकांना शासनाने समाविष्ट करून घेतले आहे. अशा गरीब नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण यासारख्या अत्यंत महागड्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात. त्याचप्रमाणे (MJPJAY) योजनेच्या अंतर्गत कोविड -19 महामारीच्या कालावधीत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि तसेच ग्रामीण भागातील गरीब नागरिक व आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी या सर्व नागरिकांना हि महात्मा फुले जन आरोग्य योजना जीवनदायनी ठरलेली आहे, आणि शासनाच्या निर्णयाप्रमाणे 1000 अंगीकृत रुग्णालयाच्या माध्यामतून 20 पॅकेजच्य अंतर्गत नागरिकांना वैद्यकीय उपचार दिले जातात.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंर्तगत ब्लॅक फंगस (म्युकरमाईकोसिस)
उपचार

महाराष्ट्र सरकारने ब्लॅक फंगस आजाराचा उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे, शासनाचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला कळविण्यात आला आहे या योजनेच्या अंतर्गत पूर्वी निर्धारित केकेल्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये या म्युकरमाईकोसिस आजाराचा उपचार सर्व पात्र नागरिकांना देण्यात येणार आहे त्याच प्रमाणे दुर्गम भागात राहणारे आदिवासी, गरीब, अशिक्षित नागरिकांना सुद्धा या आजारामध्ये या योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार या योजनेची व्याप्ती वाढवीत आहे. तसेच ब्लॅक फंगस आजाराला लागणाऱ्या आवश्यक औषधी या रुग्णालयांमध्ये भर्ती रुग्णांना मोफत देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात सुमारे 130 रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगस आजाराचा उपचार केला जात आहे, आणि जे नागरिक या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी आहे आणि जे नागरिक या योजनेंतर्गत लाभार्थी नाहीत त्या रुग्णांना सुद्धा या रुग्णालयात उपचार दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनुसार आगामी काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ब्लॅक फंगस आजाराच्या उपचारासाठी आणखी 1000 रुग्णालयांचा समावेश या नेटवर्क मध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन खाजगी रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगस आजाराच्या उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या जास्त बिलांवर नियंत्रण आणने आणि त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये म्यूकरमाकोसिस उपचारासाठी मूल्य निर्धारित करणे या दिशेने महाराष्ट्र सरकार काम करत आहे.

ब्लॅक फंगस आजाराची माहिती :- महाराष्ट्र शासनाने म्युकरमाईकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट केले आहे. करोना आजाराचे नवीन नवीन प्रकार आणि त्यांचे उपचार यानंतर एक नवीन आजार समोर आला आहे, ज्या रुग्णांना करोना होऊन ते बरे झालेत त्या रुग्णांमध्ये हा आजार दिसून आला आहे, ब्लॅक फंगस एक प्रकारचा फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे हे इन्फेक्शन नाकानंतर रुग्णाच्या डोळ्यांमध्ये दिसून येते जर हा आजार रुग्णाच्या मेंदूपर्यंत पोहोचला तर रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होतो, या इन्फेक्शन मध्ये रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कधी कधी रुग्णाचा डोळा काढावा लागतो. तसेच ब्लॅक फंगस आजाराचा उपचार महागडा असतो त्यामुळे साधारण नगरीकांना या आजारासाठी उपचार मिळविण्याची समस्या निर्माण झाली होती, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे गरीब साधारण नागरिकांसाठी हि योजना जीवनदाई योजना ठरली आहे.

एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) माहिती मराठी

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

या एकात्मिक योजनेंतर्गत विशेष सेवांच्या अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार अशा ज्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी रुग्णांना रुग्णालयामध्ये भर्ती होण्याची आवशयकता असते त्यांना अंगीकृत रुग्नालायांव्दारे लाभार्थ्यांना कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करणे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2018 पासून भारत सरकारव्दारा सुरु करण्यात आली. AB- PMJAY महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समाकलनात सुरु करण्यात आली हि योजना विमा आणि अशुरन्स मोडवर लागू करण्यात आली, एकात्मिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2020 रोजी राज्यात सुरु करण्यात आली या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आरोग्य सेवा पुरवीत आहे, 

या एकात्मिक योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विमा मोड अंतर्गत विमा संरक्षण आणि राज्य आरोग्य हमी सोसायटी विमा मोडवर संरक्षण प्रदान करते. स्टेट हेल्थ अॅश्युरन्स सोसायटी पात्र लाभार्थी कुटुंबाच्या वतीने प्रतीवर्षी 797/- रुपये प्रती कुटुंब विमा प्रीमियम भरत आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार व्दारे संयुक्तपणे 60:40 च्या प्रमाणात अनुदानित आहे. हि योजना सुरवातीला नॅशनल इन्शुरन्स कंपनी व्दारे चालवली जात होती त्यानंतर या एकात्मिक (MJPJAY) आणि (AB-PMJAY) योजना युनायटेड इन्शुरन्स कंपनी व्दारे चालविल्या जात आहे.

एकात्मिक (MJPJAY) आणि (AB-PMJAY) योजनेंतर्गत लाभार्थी :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थी वर लेखामध्ये दिल्या प्रमाणे राहील, तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी खालीलप्रमाणे आहेत.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी :- या योजनेंतर्गत समाविष्ट कुटुंबे अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी आर्थिक व सामाजिक जात जनगणना 2011 च्या स्वयंचलित समावेश, वंचितता आणि व्यावसायिक निकषांवर आधारित आहे.

शहरी लाभार्थी :- शहरीभागांसाठी पुढील निकष आहे ;- कचरा निवडणारे, भिकारी, घरगुती कामगार, रस्त्यावरचे विक्रेते, मोची, फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर, गवंडी, पेंटर, वेल्डर, सफाई कामगार, स्वच्छता कामगार, माळी, गृहस्त कामगार, कारागीर, हस्तकला कामगार, शिंपी, वाहतूक कामगार, ड्रायव्हर, कंडक्टर, मदतनीस, रिक्षाचालक, दुकानातील कामगार, सहाय्यक शिपाई, वेटर, इलेक्ट्रिशन, मेकॅनिक, असेम्ब्लर, दुरस्ती कामगार, पुरुष चौकीदार.

ग्रामीण भागातील लाभार्थी :- ग्रामीण भागातील कच्च्या भिंती कच्चे छप्पर असलेली एकच खोली असे कुटुंब, अनुसूचित जाती जमाती कुटुंब, भूमिहीन कुटुंब, ज्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अंगमेहनतीच्या कामातून येतो असे कुटुंब, आपोआप समाविष्ट केलेल्या श्रेणीमध्ये निवारा नसलेली कुटुंबे, आदिम आदिवासी गट, आणि कायदेशीर मुक्त झालेल्या बंधपत्रीत कामगारांचा समावेश होतो.

एकात्मिक (MJPJAY) आणि (AB-PMJAY) योजना पात्रता आणि लाभार्थी ओळख :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी वरील लेखामध्ये दिल्याप्रमाणे राहील.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी पुढील प्रमाणे आहेत :- या योजनेंतर्गत सामजिक आणि आर्थिक जात जनगणना 2011 अंतर्गत नोंदणीकृत कुटुंबामधील PMJAY सदस्य संगणीकृत ई-कार्ड आणि फोटो ओळखपत्र दाखऊन सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये लाभ मिळविण्यासाठी पात्र आहेत. ई-कार्ड आणि फोटो ओळख पुरावा असलेल्या कोणत्याही राज्यातील PMJAY चा लाभार्थी इतर कोणत्याही राज्यातील कोणत्याही पॅनेलीकृत रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.

पात्र निकषांच्या कागदपत्रांची यादी आणि वैध फोटो आयडी यादी :- लाभार्थीच्या फोटोसह आधारकार्ड, आधार नोंदणी स्लीप आधार कार्डचा ओळख दस्तऐवज म्हणून आग्रह धरला जाईल आणि आधारकार्ड / क्रमांक नसतानाही, आधारकार्ड जारी करण्यासाठी स्वीकारले जाणारे कोणतेही कागदपत्र देखील स्वीकारले जातील.

  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • शाळा / कॉलेज आयडी
  • पासपोर्ट
  • स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र
  • RGJAY / MJPJAY चे हेल्थ कार्ड
  • अपंग प्रमाणपत्र
  • फोटोसह राष्ट्रीय बँकचे पासबुक
  • जेष्ठ नागरिक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले कार्ड 12. सैनिक बोर्डाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
  • सागरी मत्स्यपालन ओळखपत्र ( महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालय / मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे जारी केलेले)
  • महाराष्ट्र सरकारच्या / भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा 

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभ कव्हरेज

आयुष्मान भारत PM-JAY या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील उपचारांसाठी प्रती कुटुंब प्रतिवर्षी 5 लाख रुपये एवढा लाभ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला फ्लोटर आधारावर उपलब्ध आहे. योजनेमध्ये 34 प्रकारच्या विशिष्ट उपचारांच्या संदर्भात कॅशलेस उपचारांव्दारे वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायाझेशन कव्हर करण्यासाठी हि पॅकेज वैद्यकीय विमा योजना आहे. MJPJAY लाभार्थ्यांना 121 फॉलोअप प्रक्रीयेसह 996 वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेचा लाभ मिळतो आणि PMJAY लाभार्थ्यांना 1209 वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियांचा व अतिरिक्त 213 वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रिया, 183 फॉलोअप प्रक्रियांचा लाभ मिळतो. 996 MJPJAY प्रक्रियेपैकी 131 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत आणि PMJAY 1209 प्रक्रियेसाठी अतिरिक्त 37 सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत. 1209 पॅकेजसमध्ये जनरल वार्ड मधील बेडचे शुल्क, नर्सिंग आणि बोर्डिंग शुल्क, सर्जन आणि एनेस्थेटीस्टचे शुल्क, मेडिकल प्रक्टिशनर, आणि सल्लागार शुल्क, ऑक्सिजन, ओटी आणि आयसीयु शुल्क, सर्जिकल उपकरणांची किंमत, औषधांची किंमत, डिस्पोजेबल, उपभोग्य वस्तू, प्रत्यारोपण, प्रत्यारोपणाचे शुल्क समाविष्ट आहे, उपकरणे, रक्त देण्याची किंमत (राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रदान केले जाणारे रक्त) क्ष-किरण आणि निदान चाचण्या, आंतररुग्णांना अन्न, राज्य परिवहन किंवा दुसऱ्या श्रेणीचे रेल्वे भाडे (फक्त रुग्णालयापासून रुगांच्या निवासस्थानापर्यंत) या पॅकेजमध्ये रुग्णांच्या  रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याच्या तारखेपासून रुग्णाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च समविष्ट आहे, ज्यामध्ये काही गुंतागुंत असेल तर रुग्णाचा व्यवहार खरोखर कॅशलेस होईल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयातील उपचारची प्रक्रिया

लाभार्थी कुटुंबाने जवळच्या PHC / ग्रामीण, उपजिल्हा, सामान्य, महिला, / जिल्हा रुग्णालय, नेटवर्क रुग्णालयाशी संपर्क साधावा, वरील रुग्णालयात ठेवलेले आरोग्य मित्र लाभार्थ्यांची व्यवस्था करतील. जर लाभार्थी नेटवर्क रुगालय व्यतिरिक्त सरकारी आरोग्य सुवीधेला भेट देत असेल, तर त्यांना डॉक्टरांव्दारे प्रथमिक निदानासह नेटवर्क रुग्णालयाचे रेफरल कार्ड दिले जाईल. लाभार्थी खेडयात नेटवर्क रुग्णालयव्दारे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना देखील उपस्थित राहू शकतात आणि निदानाच्या आधारे ते रेफरल कार्ड मिळवू शकतात.

  • अंगीकृत रुग्णालयामधील आरोग्यमित्र वैध रेशनकार्ड आणि फोटो आयडी तपासतात आणि रुग्णाची नोंदणी करून नोंदणीकृत करतात
  • त्यानंतर योजनेच्या आवश्यकतेनुसार प्रवेश पत्र, केलेल्या चाचण्या यासारखी माहिती नेटवर्क हॉस्पिटलच्या वैद्यकीय समन्वयकाव्दारे समर्पित डेटाबेसमध्ये कॅप्चर केली जाईल
  • जर MJPJAY लाभार्ठीसाठी 996 प्रक्रिया आणि PMJAY लाभार्ठीसाठी 1209 प्रक्रियांमध्ये हि प्रक्रिया येत असेल, तर हॉस्पिटलकडून अनिवार्य कागदपत्रे जोडून ई-प्राधिकरण विनंती केली जाते.
  • विमा कंपनीचे मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकारी पूर्व अधिकृतीकरण विनंतीचे परीक्षण करतात आणि सर्व अटी पूर्ण झाल्यास, पूर्व अधिकृतीकरण मंजूर करतात. हे कामाच्या 12 तासांच्या आत आणि आणीबाणीच्या परिस्थितीत ताबडतोब केले जाईल ज्यामध्ये ई-प्राधिकरण ‘EM’ म्हणून चिन्हांकित केले जाईल, पूर्व अधिकृतीकरणाची वैधता सात दिवसांसाठी असेल.
  • पूर्व अधिकृतता नाकारली गेली असेल, तर ती दुसरी पायरी म्हणून TPA चे CMO आणि SHAS चे CMO असलेल्या तांत्रिक समितीकडे पाठविले जाते. TPA चे CMO आणि SHAS चे CMO यांच्यात मतभेद असल्यास, प्रकरण ADHS-SHAS कडे तिसरी पायरी म्हणून संबोधली जाते. ADHS चा पूर्व अधिकार मंजूर किंवा नाकारण्याचा निर्णय अंतिम आहे.
  • पूर्व अधिकृतीकरण मंजूर झाल्यानंतर प्रक्रिया खाजगी रूग्णालयाव्दारे 30 दिवसांच्या आत आणि सार्वजनिक रूग्णालयाव्दारे 60 दिवसांच्या आत केली जाईल. त्यानंतर पूर्व अधिकार स्वयं रद्द होईल. SHAS ला सरकारी रुग्णालयांचे स्वयं रद्द केलेले पूर्व अधिकार पुन्हा उघडण्याचा अधिकार असेल.
  • पूर अधिकृतीकरणावर निर्णय घेण्यासाठी टर्न अराउंड वेळ 12 तास आहे. आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय/ शस्त्रक्रिया पूर्व अधिकृतीकरण मंजुरी MCO व्दारे दूरध्वनीव्दारे घ्यावी लागते इमर्जन्सी टेलिफोनिक इंटीमेशन (ETI) ज्यामध्ये व्हाईस रेकॉर्डींग सुविधा आहे.
  • अंगीकृत रुगणालय लाभार्थ्यांना कॅशलेस वैद्यकीय सर्जिकल उपचार प्रदान करते. नेटवर्क हॉस्पिटलच्या पोस्टऑपरेटीव्ह / दैनंदिन उपचारांच्या नोंदणी नेटवर्क हॉस्पिटलच्या वैद्यकीय समन्वयकाव्दारे पोर्टवर दररोज अपडेट केल्या जातील.
  • नेटवर्क हॉस्पिटल वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर निदान अहवाल अपलोड करते, रुग्णालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी रीतसर स्वाक्षरी केलेला डिस्चार्ज सारांश, तसेच ऑपरेशनल मार्गदर्शक तत्वानुसार वाहतूक खर्चाची देयके आणि इतर कागदपत्रे.
  • जर प्रक्रिया फॉलो-अप प्रक्रियेच्या श्रेणीमध्ये येत असेल तर फॉलो-अप तपशील रुग्णांना डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलव्दारे सूचित केल्या जाईल. रुग्णांना फॉलो-अप प्रक्रिया आणि सबंधित तपशिलांबद्दल शिक्षित करणे देखील आरोग्यमित्राची जबाबदारी असेल.
  • अंगीकृत रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसापर्यंत योजनेंतर्गत मोफत पाठपुरावा सल्ला, निदान आणि औषध प्रदान करेल.
  • विमाकर्ता ऑपरेशनल मार्गदर्शक तत्वांच्या प्रकाशात बिलांची छाननी करतो आणि अनिवार्य तपासणीत मान्य पॅकेज दर आणि रुग्णालयाच्या श्रेणीनुसार दावे अदा करतो, नेटवर्क हॉस्पिटलकडून दाव्याचे संपूर्ण  कागदपत्र मिळाल्यानंतर विमा कंपनी 15 कामकाजाच्या दिवसात रुग्णालयांचे दावे ऑनलाइन निकाली काढतो.
  • इलेक्ट्रोनिक क्लिअरन्स् आणि पेमेंट गेटवेसह क्लेम सेटलमेंट मॉड्युल स्टेट हेल्थ अॅशुरन्स सोसायटी (SHAS) पोर्टल मधील वर्कफ्लोचा भाग असेल आणि विमा कंपनीव्दारे ऑपरेट केले जाईल.
  • अहवाल स्टेट हेल्थ अॅशुरन्स सोसायटी (SHAS) लॉगिनवर उपलब्ध असतील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थी पात्रता

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे आहे

  • महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील परिवार यो योजनेसाठी पात्र आहे
  • केशरी / पिवळे / पांढरे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड किंवा अन्नपूर्णा कार्डधारक या योजनेस पात्र आहे
  • अमरावती, वाशीम, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, हिंगोली, बीड, जालना, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, उस्मानाबाद, वर्धा या सारख्या अनेक कृषीविषयक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे
  • अर्ज करणारे नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आवशयक कागदपत्र

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवशयक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत

  • ओळखपत्र म्हणून रेशनकार्ड पिवळे, पांढरे, केशरी, यापैकी कोणतेही किंवा खालीलप्रमाणे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • अपंग प्रमाणपत्र
  • छायाचित्रासह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • शाळा / कॉलेज आयडी 
  • शहरीभागांसाठी तहसीलदारचा शिक्का
  • पासपोर्ट
  • स्वात्यंत्र सैनिक ओळखपत्र
  • केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेले जेष्ठ नागरिक कार्ड
  • सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
  • शासनाने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा
  • मरीन फिशर्स ओळखपत्र
  • नवीन जन्म झालेल्या बाळाच्या बाबतीत ज्यामध्ये वैध पिवळ्या रेशनकार्ड किंवा केशरी रेशनकार्ड वर मुलाचा फोटो आणि नाव उपलब्ध नसतील अशा परिस्थिती मध्ये केशरी / पांढऱ्या / पिवळे रेशनकार्ड आणि जन्म झालेल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र व मुलाचा फोटो त्याच्या पालकापैकी एकासह जमा करावा  लागेल. 

(MJPJAY) हेल्पलाईन नंबर

  • वाचक मित्रहो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या सबंधित संपूर्ण महत्वाची माहिती आम्ही या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आपल्याला आणखी माहिती जाणून घायची असेल तर या योजनेच्या आधिकारिक वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा खालीलप्रमाणे हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून माहिती मिळऊ शकता.
  • 155388
  • 18002332200 
  • Official Website :- jeevandayee.gov.in
  •  List of Id Proofs :- Click Here

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना FAQ

Q. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्डसाठी अर्ज कसा करावा ?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्ड मिळविण्याला अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या महिला किंवा जिल्हा, नेटवर्क रुग्णालयाशी संपर्क साधावा लागेल, रुग्णालयात गेल्यावर आरोग्यमित्र जो या योजनेचा प्रतिनिधी असतो तो तुम्हाला योजना हेल्थ कार्ड मिळविण्यास मदत करेल.

किंवा महत्वाचे म्हणजे तुम्ही आरोग्य सुविधेला भेट दिल्यास, डॉक्टरांव्दारे प्राथमिक निदान सुरु करण्यासाठी तुम्हाला नेटवर्क रुग्णालयात एक रेफरल कार्ड दिले जाईल, तसेच तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलव्दारे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांना देखील उपस्थित राहून हेल्थ कार्ड मिळऊ शकता.

Q. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकारचा हि योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश गरीब आणि आर्थिक दुर्बल व समाजातील असुरक्षित घटकांना जे दारिद्र्य रेषेखालील आणि तसेच दारिद्र्य रेषेवरील परिवार आहेत त्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.

Q. MJPJAY अंतर्गत उपचारासाठी मला काही पैसे द्यावे लागतील काय ?

महाराष्ट्र शासनाने हि योजना समजतील वंचित आणि आर्थिक दुर्बल नागरीकांनसाठी राबविलि आहे आणि हि योजना एक विमा संरक्षण योजना आहे या योजनेमध्ये आरोग्य सेवांसाठी लाभार्थ्यांना रुग्नालयाला  कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही.

Q. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अतर्गत कमाल विमा संरक्षण किती आहे ?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांच्या उपचार प्रक्रियेमधील आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब 2 लाख इतकी ठेवण्यात आली आहे तसेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा वाढूऊन 3 लाख दरवर्षीप्रमाणे प्रतीकुटुंब करण्यात आली आहे, या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश राहील, तसेच या योजनेंतर्गत उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचा उपचारांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!