कसा करणार अर्ज ?
Biogas subsidy scheme संबंधित पशुपालकाने आवश्यक कागदपत्रासह पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज करावा. यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसल्याने अधिक अर्ज आल्यास लकी ड्रॉ प्रमाणे लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
तुमच्या गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
काय लागतील कागदपत्रे ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे चार गाय, म्हेंस, बैल असे पशुधन असले पाहिजे. त्यासंबंधीचे ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, सातबारा आणि नंबर 8 अ चा उतारा, आधार, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत बायोगॅस उभारून त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळणार आहे. यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे. असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी पशशुपालकांना आवाहन केलं आहे.