पुन्हा कर्जमाफी ! न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार |loan waiver for farmers

Maharashtra : शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Loan waiver for farmers again

एका मोठ्या घडामोडीत, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 6 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.

यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिल्यानंतर हे झाले आहे.

हे वाचा: सरसकट पिक विमा मंजूर..! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २७५०० रुपये Crop Insurance

२०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेत होते. यादरम्यान फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना अंमलात आणली होती.

मोबाईल नंबर टाकून लगेच ३ ते ५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळवा तेही फक्त ५ मिनिटांत👇

या योजनेप्रमाणे ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मुद्दल व त्यावरील व्याजासह १.५ लाख रुपये मयदिपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु पुढे जाऊन एकूण कर्जाची व्याप्ती पाहून पोर्टल बंद करूनत्यातून काढता पाय घेतला होता. याची अंमलबजावणी करताना सुमारे ५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शेतकरी संघटनेने ॲड. अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती.

आता या प्रकरणी न्यायालयाने आदेश दिले आहेत व देऊन सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. या आदेशानुसार आता शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर झाली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचा आदेश दिला होता. तरीही शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.

न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात दीड लाखाच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सांगितले जात आहे.

तुमच्या मोबाईल नंबर वर ३ ते ५ लाख रुपये कर्ज काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली

न्यायालयाच्या निकालानंतर नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. या घोषणेमुळे पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे. शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी न्यायालयीन लढाई केल्यामुळे

महाराष्ट्रातील ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार कोटी रुपये मिळणार आहेत असे कालिदास आपेट यांनी सांगितले. एकंदरीतच शेतकऱ्यांसाठीची लढाई जिंकली असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

अरे व्वा! गांडूळ खताचा व्यवसाय सुरू करा, सरकार देत आहे ...
पुढे वाचा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र शासन राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध ...
पुढे वाचा
मोफत भांडी योजना महाराष्ट्र | कामगार योजना महाराष्ट्र संपुर्ण माहिती

मोफत भांडी योजना महाराष्ट्र | कामगार योजना महाराष्ट्र संपुर्ण माहिती

कामगार योजनेअंतर्गत मोफत भांडी मिळण्याबाबत संपूर्ण माहिती भारतामध्ये असंख्य कामगार ...
पुढे वाचा
महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता. | Weather Maharashtra

महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता. | Weather Maharashtra

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता उत्तर भारतात वादळी वारे ...
पुढे वाचा
विधवा पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत पहा व अर्ज करा.|vidhawa pension yojana apply

विधवा पेन्शन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत पहा व अर्ज करा.|vidhawa pension yojana apply

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेत अर्ज कसा करावा? विधवा पेन्शन योजनेअंतर्गत ...
पुढे वाचा
डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत: Diesel Pump Subsidy Online ...
पुढे वाचा

Leave a Comment