पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहेत. मोदी सरकारने त्याचा 16 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करण्यात आला. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग केले आहेत.
सरकार दरवर्षी 6,000 रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करते. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये हे पैसे मिळतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.
शेतकऱ्यांनी प्रथम त्यांना 2000 रुपयांचा एसएमएस आला आहे की नाही हे तपासावे. पैसे ट्रान्सफर झाले की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या पद्धतींद्वारे पीएम किसानची शिल्लक तपासू शकता.
पी एम किसान लाभार्थी यादी कशी तपासायची:
1. अधिकृत वेबसाइटद्वारे:
- https://pmkisan.gov.in ला भेट द्या.
- “Farmer’s Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा.
- “Aadhaar Number”, “Account Number” किंवा “Mobile Number” मधून एक निवडा.
- संबंधित माहिती टाका आणि “Get Report” वर क्लिक करा.
- तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला हप्त्या मिळत आहेत.
हप्त्याची स्थिती कशी तपासायची:
1. PM किसान पोर्टलद्वारे:
- https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
- “Farmer’s Corner” मध्ये “Payment Status” वर क्लिक करा.
- “Aadhaar Number”, “Account Number” किंवा “Mobile Number” मधून एक निवडा.
- संबंधित माहिती टाका आणि “Get Report” वर क्लिक करा.
- तुम्हाला हप्त्याची तारीख, रक्कम आणि इतर माहिती दिसून येईल.