फेरफार उतारा कसा काढायचा? | How to download ferfar land record.

फेरफार उतारा कसा काढायचा? स्टेप बाय स्टेप माहिती.

फेरफार उतारा काढण्यासाठी तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.

फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

यानंतर महसूल विभागाचं ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, इथं येऊन सातबारा, आठ-अ काढला असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला इथल्या सेवांचा लाभ घेता येतो.

ते कसं तर त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

फेरफार उतारा

त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज तिथं येईल.

याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच One Time Password म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला Enter OTPच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.

त्यानंतर Verify OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

पुढे तुमच्यासमोर आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.

यातल्या Digitally signed eFerfar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

फेरफार उतारा

त्यानंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत फेरफार’ असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every eferfar. This amount will be deducted from available balance.”

याचा अर्थ फेरफार उताऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.

आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं.

ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

तिथं एंटर अमाऊंट समोर 15 रुपये एवढा आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊवर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथं असलेल्या छोटा डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग कन्फम बटन दाबायचं आहे.

त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अॅप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.

फेरफार उतारा

पेमेंटसाठीची ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलववर एक ओपीटी पाठवला जातो. तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर your payment was successful याचा अर्थ तुम्ही 15 रुपये जमा केले आहेत, असा मेसेज येतो. इथं असलेल्या continue या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतल्या सातबारा उताऱ्याचं पेजवर तिथं ओपन होईल. पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने Digitally signed eFerfar यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव, फेऱफार नंबर टाकायचा आहे. तुमच्या सातबारा उताऱ्यावरील हा फेरफार क्रमांक नमूद केलेला असतो.

शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करायचं आहे.

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

शेतकरी, प्रातिनिधिक फोटो
फोटो कॅप्शन,शेतकरी, प्रातिनिधिक फोटो

त्यानंतर RS.15 will be deducted from your available balance for Ferfar download, असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्याखालच्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार तिथं डाऊनलोड होईल.

यात सुरुवातीला फेरफाराचा क्रमांक, त्यानंतर अधिकाराच्या स्वरुपात काय बदल झाला, याची सविस्तर माहिती दिलेली असते. पुढे परिणाम झालेले गट क्रमांक आणि अधिकाऱ्याचं नाव आणि शेरा दिलेला असतो.

या उताऱ्यावर शेवटी स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, “हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल स्वाक्षरीत 21-07-2021 रोजी डेटा वरून तयार झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही-शिक्क्याची आवश्यकता नाही.”

NLM scheme. शेळीपालन योजना

NLM scheme. शेळीपालन योजना

NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप अर्थसाह्याचे स्वरूप ...
पुढे वाचा
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
पुढे वाचा
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा. 1.हवामान ...
पुढे वाचा
गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय,म्हैस,शेळी,मेंढी,कुकुटपालन,तलंगा,सुधारित पिल्ले अनुदान योजना | Gai Mhais Sheli Mendhi Palan ...
पुढे वाचा
आता गूगल पे ॲप मधून पर्सनल लोन मिळवा | get personal loan using Google pay application

आता गूगल पे ॲप मधून पर्सनल लोन मिळवा | get personal loan using Google pay application

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन ...
पुढे वाचा
क्रोम

क्रोम

क्रोम ब्राउझर काय आहे? क्रोम ब्राऊझर हा एक वेब ब्राउझर ...
पुढे वाचा
या प्रकारे करा सातबारा 7/12 उतारा डाऊनलोड

या प्रकारे करा सातबारा 7/12 उतारा डाऊनलोड

शासनाच्या महाभुलेख वेबसाइटवरून डाऊनलोड करा. महाभुलेख वेबसाइटवर जा: https://bhulekh.mahabhumi.gov.in/.तुमचा जिल्हा ...
पुढे वाचा

Leave a Comment