व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी 50 लाखांच्या कर्जासह 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी चा लाभ घ्या |पोल्ट्री फार्म अनुदान योजना.

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंत कर्ज देतंय.

ही योजना काय आहे, यासाठी कोण पात्र आहे आणि याला अर्ज कसा करायचा ते समजून घेऊ.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याअंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशू कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

मांस, दूध आणि अंडी यांचं उत्पादन अनेक पटींनी वाढवण्याच्या हेतूने ही योजना काढण्यात आली आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 129 अब्ज अंड्यांचं उत्पादन झालं. केंद्र सरकारला हे उत्पादन अजूनही पुढे वाढवायचं आहे.

या व्यवसायाला 50% अनुदान मिळवण्यासाठी शासनाकडे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👇👇

नेमकी काय आहे ही योजना?

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाईल. यावर 50 टक्के सबसिडी मिळेल.

उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाखाचं कर्ज घेतलं तर तुम्हाला 25 लाख परत करावे लागतील. पण हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हफ्त्यांत जमा करावे लागतील.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत पोल्ट्री शेड बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कर्ज कोणाला मिळू शकतं?

या योजनेअंतर्गत कोणी व्यक्ती, बचत गट, उद्योजक, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था कोणाही कर्ज मिळवू शकतं.

या योजनेसाठी कोणतीही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी सरकारने खास राष्ट्रीय पाळीव पशू मिशन पोर्टल (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन पोर्टल) काढलं आहे.

कर्ज घेणाऱ्याच्या नावावर कमीत कमी एक एकर शेतजमीन हवी. यासंबंधित कागदपत्र अर्जाला जोडलेली हवी. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर लीजवर घेतलेल्या जमिनीवरही कर्ज घेता येतं पण अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने दिलं जातं.

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याआधी एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो. पोल्ट्री फार्मची योजना काय आहे हे यात विशद करावं लागतं आणि ऑनलाईन तो फॉर्म पोर्टलवर अपलोड करावा लागतो.

कोणती कागदपत्रं लागतात?

  • सविस्तर प्रकल्प अहवाल
  • आधार कार्ड
  • पोल्ट्री फार्म उभं करायचं आहे त्या जागेचे फोटो
  • जमिनीची कागदपत्रं
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल चेक
  • रहिवासी दाखला
  • आवश्यक फॉर्म
  • जात प्रमाणपत्र (गरजेचे असल्यास)
  • कौशल्य प्रमाणपत्रं
  • स्कॅन सही

एकदा कागदपत्रांची जुळवाजुळव झाली की नॅशनल लाईव्हस्टॉक पोर्टलवर जाऊन आपला यूझर आयडी आणि पासवर्ड बनवावा. त्यासाठी www.nlm.udayanidhimitra.in/Login portal या पोर्टलला भेट द्यावी.

तुमचा अर्ज कोणत्या पायरीवर आहे याची माहिती तुम्हाला याच पोर्टलवर मिळेल.

पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अर्ज करताना काय काळजी घ्यावी?

तुम्ही लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. आपली सगळी कागदपत्रं नीट असावीत ही काळजी घ्यावी. तसंच नक्की किती कर्ज हवं आहे हे अर्ज करतानाच नमूद करावं.

पोल्ट्रूी

तुमचा प्रकल्प अहवाल सर्वात महत्त्वाचा आहे. यात तुम्हाला नेमक्या किती कोंबड्या पाळायच्या आहेत,त्यांच्या पालनासाठी किती खर्च येणार, त्यांना खाऊपिऊ घालण्याचा खर्च किती हे सगळं नीट नमूद केलेलं असावं. सगळी माहिती खरी असावी.

पडताळणी दरम्यान कोणतीही माहिती खोटी किंवा संशयास्पद आढळली तर अर्ज रद्द होऊ शकतो.

सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे का?

होय, या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असल्यास तुमचा सिबील स्कोर चांगला असणं आवश्यक आहे. तो चांगला नसल्यास बँका कर्ज देणार नाहीत.

प्रशिक्षणाची आवश्यकता?

कुक्कुटपालन हा व्यवसाय जोखमीचा आहे. त्यामुळे या व्यवसायात उतरताना प्रशिक्षण असणं अत्यंत आवश्यक ठरतं.

कोंबड्यांची निगा कशी राखावी, त्यांना रोगापासून कसं दूर ठेवावं, त्यांना काय खायला द्यावं ही सगळी माहिती आधी असणं आवश्यक आहे.

या कर्जासाठी स्थानिक भागात कोणाला संपर्क कराल?

ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकार नोडल एजन्सी असेल. ऑनलाईन जरी अर्ज केला तरी तुमचे अर्ज याच एजन्सीव्दारे बँकांपर्यंत जातील.

अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याला संपर्क करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांची मदत घेऊ शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!