व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

मित्रांनो नमस्कार, आजच्या ऑनलाईन युगात प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता कोणीही काही सेकंदात देशातील कोणत्याही व्यक्तीला बँक खात्याचा वापर करून ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. भारत सरकारच्या UPI सुविधेमुळे तर आता पैशांचे व्यवहार अत्यंत सुलभ आणि सुरक्षित झाले आहेत. काही जणांच्यासाठी एकापेक्षा अधिक बँक खाती असणे ही आवश्यक असते.

देशात फोन पे, गूगल पे आणि PAYTM सारख्या ॲप चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील मोठ्या बँका या सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत परंतु काही जिल्हा बँका आणि आणि पतसंस्था मध्ये अश्या आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

देशभरात अग्रगण्य असणारी कोटक महिंद्रा बँकेने नवीन ग्राहकांच्या गरजा ओळखून नवीन योजना आणली आहे, याअंतर्गत नवीन ग्राहक एकही पैसा न देता कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडू शकतो. तसेच ग्राहकाला बँकेत जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनवरून बँकेच्या वेबसाइटवरून 15 मिनटात कोटक महिंद्रा बँकेचे खाते उघडू शकता. हे खाते असे उघडायचे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra)

कोटक महिंद्रा बँक ही भारतातील एक अग्रगण्य खाजगी क्षेत्रातील बँक आहे. १९८५ मध्ये स्थापन झालेली ही बँक भारताच्या आर्थिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक बनली आहे, देशभरातील ६०० हून अधिक शहरे आणि गावांमध्ये उपस्थिती आहे. कोटक महिंद्रा बँक व्यक्ती, कॉर्पोरेट्स आणि शेतकरी ग्राहकांना विस्तृत श्रेणीतील बँकिंग उत्पादने आणि सेवा प्रदान करते. बँकेची ताकद तिच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनात, मजबूत ग्राहक संख्या आणि तंत्रज्ञान सुविधा यामध्ये आहे.

या बँकेत काढलेल्या खात्याबरोबर ग्राहकाला ATM कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप्लिकेशन, Google Pay साठी UPI इत्यादी सुविधा अगदी निःशुल्क दिल्या जातात. हे खाते काढल्यानंतर ग्राहकाला कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, सर्व बँकिंग व्यवहार सुरक्षित KOTAK811 ॲप च्या माध्यमातून करता येतात.

आवश्यक कागदपत्रे

मित्रांनो कोटक महिंद्रा बँकेत ऑनलाईन खाते काढण्याच्या प्रक्रियेत कोणती कागदपत्र आवश्यक आहेत, ते आता आपण पाहूया.

  • तुमचे आधार कार्ड
  • तुमचे पॅन कार्ड
  • तुमच्या सहीचा फोटो
  • आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल क्रमांक

खाते काढण्याची प्रक्रिया

सर्व क्षेत्रातील व्यक्तींना उपयोगी असलेले हे मोफत खाते कसे उघडायचे याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया

  1. कोटक महिंद्रा बँकच्या वेबसाइटला भेट द्या आणि “खाते उघडा” वर क्लिक करा.
  2. “ऑनलाइन खाते उघडा” हा पर्याय निवडा.
  3. आपल्या वैयक्तिक माहितीसह फॉर्म भरा, ज्यात आपले नाव, ईमेल, आणि मोबाइल नंबर यांचा समावेश आहे.
  4. त्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेलवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP टाकून Verify करा.
  5. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
  6. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो प्रविष्ट करा.
  7. त्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे upload करायची आहेत.
  8. तुमचा सेल्फी फोटो, PAN कार्डचा फोटो, आणि तुमच्या सहीचा फोटो अपलोड करायचा आहे
  9. खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  10. “पुढे” वर क्लिक करा. तुमचे बेसिक कोटक महिंद्रा बँक अकाउंट तयार होईल.
  11. यानंतर KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉल चा पर्याय निवडावा लागेल.
  12. या व्हिडिओ कॉल दरम्यान बँकेचे कर्मचारी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती विचारतील, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे Pan कार्ड दाखवावे लागेल.
  13. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर मेसेज येईल आणि तुमचे अकाऊंट सुरू होईल

आपले खाते उघडल्यानंतर, आपल्याला एक ईमेल प्राप्त होईल ज्यामध्ये आपले खाते क्रमांक आणि इतर माहिती असेल. आपण आपल्या खात्यात प्रवेश करण्यासाठी या माहितीचा वापर करू शकता.

कोटक महिंद्रा बँकमध्ये ऑनलाईन खाते उघडण्याचे फायदे

  • हे सोपे आणि वेगवान आहे.
  • आपल्याला शाखेला भेट देण्याची आवश्यकता नाही.
  • आपण आपल्या घराच्या आरामात खाते उघडू शकता.

कोटक महिंद्रा बँकमध्ये ऑनलाईन खाते उघडताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • आपण खाते उघडताना आपल्या वैयक्तिक माहितीची अचूकता तपासा.
  • आपण अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्पष्ट आणि अस्पष्ट छायाचित्रे तयार करा.
  • आपले खाते उघडल्यानंतर, आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती मिळाल्याची खात्री करा.

कोटक महिंद्रा बँकेची वैशिष्ट्ये

तंत्रज्ञान

कोटक महिंद्रा बँक ही भारतातील बँकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये एक आघडीवरची बँक आहे. बँकेने तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात प्रगती आणि गुंतवणूक केली आहे आणि मजबूत आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. बँकेची तंत्रज्ञान दृष्टीकोन बाजारपेठेत स्पर्धात्मक आघाडी मिळवण्यास मदत करत आहे. ग्राहकांना इंटरनेट बँकिंग आणि UPI सारख्या आधुनिक सुविधा देण्यासाठी बँक तत्पर आहे.

ग्राहक केंद्रितता

कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा अनुभव प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. बँकेची मजबूत ग्राहक कक्ष आहे आणि ती सतत आपल्या ग्राहक सेवा ऑफर सुधारण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबवत आहे. बँकेची ग्राहक सेवा मोहिमा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेल्या आहेत.

आर्थिक कामगिरी

कोटक महिंद्रा बँक ही भारतातील सर्वात फायदेशीर बँकांपैकी एक आहे. बँकेचे मजबूत बॅलन्स शीट आहे आणि तिचे चांगले नफा मिळवण्याचे रेकॉर्ड आहे. बँकेची आर्थिक कामगिरी सतत चांगली राहिली आहे आणि ती आपल्या वाढीच्या गतीत सुधारणा करण्यात सक्षम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!